दिशा पाटनीनं सांगितलं तिच्या ‘फेवरेट’ भारतीय क्रिकेटरचं नाव, ‘धोनी’ आणि ‘कोहली’ नव्हे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या मलंग सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा रिलीज होण्याला दोनच दिवस बाकी आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाचा ट्रेलर चर्चेत आहे. सध्या दिशा प्रोमशनमध्ये व्यस्त आहे. एका प्रमोशनपर इव्हेंटमध्ये दिशाला तिच्या फेवरेट क्रिकेटरबद्दल विचारण्यात आलं तेव्हा सर्वांना वाटलं की, ती महेंद्रसिंग धोनीचं नाव घेईल. परंतु असं काहीच झालं नाही.

काहींना वाटू शकतं की, तिनं कदाचित विराट कोहलीचं नाव घेतलं असेल. परंतु दिशानं विराटचंही नाव घेतलं नाही. दिशानं ज्याचं नाव घेतलं तो क्रिकेटर आहे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. दिशा म्हणाली, “जर मला एखाद्या मॅच जिंकवणाऱ्या खेळाडूचं नाव घ्यायचं असेल तर मी जसप्रीत बुमराहचं नाव घेईन. तो आपल्या सर्वात चांगल्या खेळांडूंपैकी एक आहे.”

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मलंगव्यतिरीक्त दिशा टायगर श्रॉफ आणि श्रद्ध कपूर यांच्या बागी 3 या सिनेमातही दिसणार आहे. मलंग सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर दिशाव्यतिरीक्त या सिनेमात आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.