‘आदित्य-दिशा’ ची जादू चालली, पहिल्याच दिवशी ‘मलंग’ नं कमावले ‘एवढे’ कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी यांचा मलंग हा सिनेमा 7 फेब्रवारी रोजी रिलीज झाला. सिनेमाची स्टोरी खूपच सरप्राईंजिंग आहे. ऑडियंस आणि क्रिटीक्सकडून सिनेमाला चांगला रिव्ह्यु मिळाला आहे. अधिकाधिक प्रेक्षकांचं म्हणणं आहे की, हा सिनेमा विचार केला त्यापेक्षाही जास्त चांगला आहे. सिनेमाच्या फर्स्ट डे बिजनेसबद्द माहिती घेऊयात.

ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शनं सिनेमाच्या कमाईबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. सिनेमानं पहिल्या दिवशी 6 कोटी 71 लाखांची कमाई केली आहे. खास बात अशी की मलंग सिनेमासोबत आणखी 6 सिनेमे रिलीज झाले होते. यात शिकारा आणि हॅक्ड यांसारखे सिनेमे आहेत. तरीही मलंगनं त्यांच्यापेक्षा जास्त कमाई केली आहे.

मलंग सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर दिशा आणि आदित्य यांच्या व्यतिरीक्त या सिनेमात अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे प्रमुख भूमिकेत आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर हा सिनेमा खूपच चर्चेत राहिला होता. दिशा आणि आदित्यच्या रोमांटीक सीन्सनं चाहत्यांचं विशेष लक्ष वेधलं होतं. मोहित सुरीनं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. त्यांनी आशिकी 2 या सिनेमाचं यापूर्वी दिग्दर्शन केलं आहे. भूषण, लव रंजन, अंकुर व जय शेवकरमनी यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.