Malang Movie Review Live : आदित्य-दिशाचा ‘मलंग’ प्रेक्षकांच्या पसंतीला, जाणून घ्या सिनेमाबद्दल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी स्टारर ‘मलंग’ प्रदर्शित झाला आहे. आधीच या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. आता चाहत्यांचे पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळत आहे. खरं तर चाहत्यांसाठी आदित्य आणि दिशा पाटनीचा मलंग सरप्राईजपेक्षा कमी नाही.

मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ हा थ्रीलर चित्रपट आहे. आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी व्यतिरिक्त अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. चित्रपटाची गाणी सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय झाली आहे.

मलंगच्या पोस्टरमधून चित्रीत करण्यात आलेल्या अंडरवॉटर किसिंगमुळे बरीच चर्चा रंगली होती. दिशा पाटणीची आदित्यबरोबरची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना आवडली आहे. फिल्मबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्साह आहे. चित्रपट ‘मलांग’च्या चाहत्यांच्या अपेक्षांवर खरे उतरेल की नाही हे पाहणे अजून बाकी आहे. सोशल मीडियावर हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया कशी आहे ते जाणून घेऊया….

‘मलंग’ रोमांस, थ्रिलर, अ‍ॅक्शन आणि स्टाइलने परिपूर्ण असलेला चित्रपट आहे. चाहत्यांनी मलांगला एक फ्रेश स्टोरी म्हटले आहे. एका चाहत्याने कमेंट केली की, आदित्य आणि दिशाने आपल्या फास्ट पेस थ्रिलरमध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे शो स्टीलर्स असल्याचे सिद्ध झाले. एकूणच मलंग पाहून छान वाटले.

https://twitter.com/DarbarSachin3/status/1225565441545981952

त्याच वेळी, असे काही लोक आहेत ज्यांना मलांग आवडला नाही. निगेटिव्ह व्हूजमध्ये लोकांनी मलंगच्या स्टोरीला वाईट म्हणून वर्णन केले आहे. एका चाहत्याने कमेंट केली की, प्रेक्षकांना बोर करणे हे त्यांची नशा आणि मजा आहे. आपल्या रिस्कवर चित्रपट पहा. दुसर्‍याने लिहले की, एक डिजास्टार आहे मलंग.

या आठवड्यात रिलीज होणार्‍या सर्व चित्रपटांपैकी या चित्रपटाला सर्वात जास्त चालण्याची अपेक्षा आहे. ट्रेड विशेषज्ञ गिरीश जोहर यांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट पहिल्याच दिवशी 6 – 7 कोटी रुपये कमवू शकतो.

मलंग व्यतिरिक्त 7 फेब्रुवारीला हिना खानचा ‘हॅक’ आणि काश्मिरी पंडितांचा ‘पलायन’ यावर आधारित ‘शिकारा’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. मात्र, मलंगबाबत चाहत्यांमध्ये अधिक क्रेझ आहे.

चित्रपटाला लोकांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. एका चाहत्याने लिहले की, हा चित्रपट रोमॅटिंक थ्रिलर आहे ज्याला तुम्ही मिस करु शकत नाही. चित्रपटाची स्टोरी लाइन याच्या थ्रिलरला खूप चांगले बनवते. सगळ्या कलाकारांनी चांगली कामगिरी केली आहे.

दुसर्‍या फॅनने लिहिले की, खूपच प्रखर. दुसर्‍या चाहत्याने लिहिले की, मलंग हे रोमॅन्स आणि थ्रिलरचे उत्कृष्ट मिश्रण आहे. चांगले डायलॉग, संगीत आणि कलाकार. ट्रेलर पाहिल्यानंतर, चित्रपट इतका चांगला होईल अशी अपेक्षा मी केली नव्हती परंतु माझ्या अपेक्षेपेक्षा हे जास्त केले, कसे ते माहित नाही. सगळ्यात आकर्षित भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे अनिल कपूर. मलंगमध्ये एका चाहत्याने अनिलचे कौतुक केले आणि लिहिले- आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी यांनी त्यांची भूमिका चांगली साकारली पण अनिल कपूर ब्रिलियंट होता. 6 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी मलंगचा स्टारकास्ट आणि बॉलिवूडचे अनेक स्टार आले होते.