Malaria | फुफ्फुस-लिव्हर वाईट प्रकारे डॅमेज करू शकतो मलेरिया, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

Malaria | symptoms causes preventions of mosquito borne disease Malaria
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मलेरिया (Malaria) हा डासांमुळे होणारा एक अत्यंत घातक रोग आहे, जो अ‍ॅनोफिलीस डासाच्या मादीच्या चाव्याव्दारे पसरतो. हा डास दंश करताना रक्तात पॅरासाईट सोडतो. पॅरासाईट शरीरात प्रवेश करताच लिव्हरकडे सरकते. मॅच्युअर झाल्यानंतर काही दिवसांनी, पॅरासाईट रक्तामध्ये प्रवेश करतो आणि लाल रक्तपेशींचे नुकसान करतो (Malaria).

 

या धोकादायक संसर्गाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिवस (world Malaria Day 2022) साजरा केला जातो. या आजाराची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती या बाबत जाणून घेवूयात (Symptoms, Causes And Prevention Of Mosquito Borne Disease)…

 

मलेरियाची लक्षणे (Symptoms Of Malaria)

मलेरियामुळे रुग्णाला अनेकदा थंडी वाजते

खूप ताप येतो

खूप घाम येतो

डोकेदुखी

मळमळ होते

उलट्या होतात

पोटदुखी होते

जुलाबाची समस्या होते

अशक्तपणा जाणवतो

स्नायू दुखण्याची समस्या होते

काही रुग्णांमध्ये आखडणे, कोमा किंवा स्टूलमध्ये रक्त येण्याची समस्या दिसते.

वरील लक्षणे शरीरात दिसू लागताच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

मलेरियाचे प्राणघातक स्वरूप (Deadly Form Of Malaria)
मलेरियाच्या (Malaria) संसर्गामध्ये रुग्णावर वेळीच उपचार न केल्यास त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. रुग्णाच्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज वाढू शकते. फुफ्फुसात द्रव साचल्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. वैद्यकीय भाषेत याला पल्मोनरी एडीमा म्हणतात.

 

याशिवाय लिव्हर, किडनी आणि प्लीहा यांसारखे प्रमुख अवयव निकामी होऊ शकतात. लाल रक्तपेशींचे नुकसान झाल्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. रुग्णाला लो ब्लड प्रेशरची समस्या देखील होऊ शकते.

 

असा करा मलेरियाला प्रतिबंध (Do This To Prevent Malaria)

1. घरामध्ये किंवा बाहेर डासांची पैदास होण्यापासून रोखा.

2. आपल्या सभोवताल स्वच्छतेची काळजी घ्या.

3. साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊ देऊ नका.

4. पाऊस सुरू होण्यापूर्वी घराजवळील नाले साफ करा, रस्त्यांवरील खड्डे बुजवा.

5. घरात वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करत रहा.

6. घरामध्ये आणि आजूबाजूला कुलर, एसी, भांडी आणि टायर इत्यादींमध्ये पाणी साचू देऊ नका.

7. पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकून ठेवा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Malaria | symptoms causes preventions of mosquito borne disease Malaria

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | कुत्रीला टेरेसवर फिरायला नेल्यावर झाडुने मारल्याचा व्हिडिओ ग्रुपवर टाकल्याने कुटुंबाने मारहाण करुन महिलेचा विनयभंग

 

‘हा’ नंबर डायल करताच हॅक होईल WhatsApp अकाऊंट, कधीही करू नका ‘या’ चूका

 

Digital Banking Fraud Alert | छोट्या चुकीमुळे रिकामे होऊ शकते बँक अकाऊंट, डिजिटल बॅकिंगमध्ये ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; जाणून घ्या

Total
0
Shares
Related Posts