वाघोलीच्या उपसरपंचपदी मालती गोगावले

वाघोली : वाघोली (ता. हवेली ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीमध्ये ग्रामविकास पॅनेलच्या मालती गणेश गोगावले यांनी विजय मिळवत वाघेश्वर पॅनेलच्या पूजा भाडळे यांचा एक मतांनी पराभव करून विजय मिळविला. गोगावले यांना ९ तर भाडळे यांना ८ मते मिळाली. हवेलीतील गर्भ श्रीमंत समजल्या जाणाऱ्या वाघोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील मालती गणेश गोगावले उपसरपंच म्हणून विराजमान झाल्या आहेत.

रोहिणी गोरे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच वसुंधरा उबाळे यांनी मंगळवार (१४ जुलै रोजी उपसरपंच पदाची निवडणूक लावली होती.उपसरपंच पदासाठी ग्रामविकासच्या मालती गोगावले तर वाघेश्वरच्या पूजा समीर भाडळे यांनी दोन अर्ज दाखल केले होते.

मालती गोगावले व पूजा भाडळे यांचा अर्ज राहिल्याने निवडणूक लावण्यात आली. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये गोगावले यांना ९ तर भाडळे यांना ८ मते पडली तर एक मत बाद झाले . त्यामुळे एका मताधिक्याने मालती गोगावले यांचा विजयी घोषित करण्यात आले.राज्यात असलेल्या कोरोना संकटामुळे कोणताही जल्लोष न करता शासकीय नियमांचे पालन करत शांततेत विजयजल्लोस साजरा करण्यात आला.