दुर्देवी ! शूटिंग चालू असताना कोसळला अभिनेता अन् हॉस्पीटलमध्ये जाण्यासाठी नाही मिळाली मदत, जागीच मृत्यू

कोची : पोलीसनामा ऑनलाइन –  केरळमधील कोची येथे वेळीच मदत न मिळाल्याने एका मळ्याळम अभिनेत्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एका जाहिरातीचे शूटिंग करतेवेळी मळ्याळम अभिनेता आणि डबिंग कलाकार प्रबीश चापाकल यांना भुरळ आली आणि ते बेशुद्ध पडले. उपचारावेळी त्यांचे निधन झाले. ते ४४ वर्षाचे होते.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, एका युट्युब चॅनलसाठी प्रबीश शूटिंग करत होते. तेव्हा त्यांना भुरळ आली. तथापि, उपस्थित असलेल्या सहकलाकारांनी आणि स्टाफ ने त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची मदत करण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही. एकही वाहन त्यांना मदत करण्यासाठी तयार नसल्याने रुग्णालयात त्यांना घेवून जाण्यास उशीर झाला. रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी उपचार सुरु केलं. परंतु, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

कचरा व्यवस्थापन विषयी केरळमध्ये जनजागृती करण्यासाठी ही टीम जाहिरातीचे शूटिंग करत होती. प्रबीश यांच्या शुटींगचा काही भाग संपल्यावर सेटवरच ते कोसळले. त्यापूर्वी त्यांनी आपल्या सहकारी टीमसोबत एक ग्रुप फोटो सुद्धा काढला होता. अलीकडेच प्रबीश यांनी कोचीन कोलाज चॅनेलच्या ओणम शोमध्ये महाबलीची भूमिका साकारली होती. त्यांनी अनेक टेलिफिल्ममध्ये काम केले आणि डबिंग कलाकार म्हणून अनेक चित्रपटात काम केले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like