प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर एमजे राधाकृष्णन यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या सिनेमोटोग्राफीमधून चित्रपट दुनियामध्ये नाव कमावणारे प्रसिद्ध फिल्ममेकर एमजे राधाकृष्णन यांचे निधन झाले आहे. ते ६१ वर्षाचे होते. समोर आलेल्या माहितीनूसार, एमजे राधाकृष्णन यांचे निधन ऱ्हदय विकारामुळे झाले आहे.

एमजे राधाकृष्णनने मल्याळम चित्रपटामध्ये आपल्या शानदार सिनेमोटोग्राफीने लाखो चाहत्यांचे मन जिंकले. त्यांनी ७० मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी शेवटी ओलू ( Olu) चित्रपटात काम केले होते.

चित्रपटांव्यतिरिक्त एमजे राधाकृष्णन यांनी अनेक डॉक्यूमेंट्रीमध्ये आपला जलवा दाखविला आहे. त्यांनी अनेक डॉक्यूमेंट्री देखील बनवल्या आहेत. त्यांना शानदार फिल्ममेकिंगसाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. सिनेमोटोग्राफीसाठी एमजे राधाकृष्णन यांना स्टेट फिल्म अवॉर्ड प्राप्त झाला आहे.

एमजे राधाकृष्णन यांनी म्हणून फोटोग्राफर म्हणून आपल्या करिअर सुरू करताना राधाकृष्णन यांनी प्रसिद्ध छायाचित्रकार-दिग्दर्शक शाजी एन करुण यांचे असिस्टंट म्हणून काम केले. त्यांना 1996 देशदानम (Deshadanam ), १९९९ करुणम ( Karunam),२००७ अदयांगल (Adayalangal), २००८ बायोस्कोप (Bioscope),२०१० वेतेलेककुल्ला वझी (Veetilekkulla Vazhi),२०११ आकाशनाथ निराम ( Akashathinte Niram)आणि 2016 काडु पुकुन्ना नेराम (Kaadu Pookunna Neram)कार्यासाठी त्यांना असे अनेक राज्य पुरस्कार मिळाला. राधाकृष्णन यांना ओक्सका फिल्म फेस्ट (2013) मध्ये दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील बायोस्कोपमधील त्यांच्या कार्यासाठी आणि पॅपिलिओ बुद्ध येथे आंतरराष्ट्रीय मोहिमेसाठी पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’