Male fertility : फर्टीलिटी वाढविण्यासाठी पुरुषांनी त्यांच्या आहारामध्ये ‘या’ 6 गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पुरुषांच्या शुक्राणू गुणवत्तेत आहार महत्त्वपूर्ण योगदान देणारा असतो. ठराविक खाद्यपदार्थामुळे शुक्राणूंची गुणवत्ता आणखी चांगली होते. नुकत्याच झालेल्या नव्या अभ्यासात असे सांगितले गेले आहे की, ट्री नट्स पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता कशी बदलतात. चला तर मग जाणून घेऊया….

शुक्राणूंच्या गुणवत्तेवर अभ्यास
अभ्यासामध्ये असे आढळले आहे की, ट्री नट्स खाल्ल्याने केवळ 14 आठवड्यांत शुक्राणूंची गुणवत्ता बदलते. हा अभ्यास 72 निरोगी पुरुषांवर करण्यात आला आहे. हे लोक आपल्या आहारात लाल मांस, साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ घेत होते. यापैकी 14 लोकांना 14 आठवड्यांसाठी दररोज 60 ग्रॅम ट्री नट्स खाण्यास सांगितले गेले होते आणि उर्वरित 24 लोकांच्या आहारात कोणताही बदल झाला नाही.

ट्री नट्स चा परिणाम
जड आहार घेणार्‍या पुरुषांच्या तुलनेत ट्री नट्स खाणाऱ्या पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये अनेक संरचनात्मक बदल अभ्यासानुसार दिसून आले आहेत. या अभ्यासात असे पुरावे आढळले की, दररोज नट्स खाणे शुक्राणूंच्या डीएनएच्या मिथिलेशनवर परिणाम करते. ट्री नट्समध्ये बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि हेझलनट्स असतात. याशिवाय इतरही काही गोष्टी शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतात.

भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियामध्ये जस्त आणि शुक्राणूंना बनवणारे सर्व आवश्यक पोषक असतात. शरीरात झिंकचे प्रमाण कमी केल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी देखील कमी होते, ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता बिघडते आणि इन्फर्टिलिटी धोका वाढतो.

डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेटमध्ये अमीनो ॲसिड एल-आर्जिनिन असतो जो शरीरातील शुक्राणू आणि वीर्य दुप्पट करतो. डार्क चॉकलेट शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते.

डाळिंब
डाळिंब- डाळिंबाचा रस अँटीऑक्सिडेंटमध्ये समृद्ध असतो ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते. अभ्यासानुसार, डाळिंबाचा रस पिल्याने पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची शक्यता कमी होते आणि लैंगिक कार्यक्षमता सुधारते.

व्हिटॅमिन सी
संत्रामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आढळतो ज्यामुळे शुक्राणूंची गतिशीलता वाढते आणि गुणवत्ता सुधारते. पुरुषांनी आहारात टोमॅटो, ब्रुसेल्स स्प्राउट्स, कोबी आणि ब्रोकोली यासारख्या व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या इतर पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

हिरव्या पालेभाज्या
पालक, ब्रुसेल्स स्प्राउट्स सारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये फोलेट भरपूर असते ज्यामुळे पुरुषांमध्ये निरोगी आणि शुक्राणू बनतात.