Male Infertility | लाईफस्टाइलसह इतर अनेक कारणांमुळे कमी होतेय पुरुषांची फर्टिलिटी, रिसर्चमध्ये खुलासा

नवी दिल्ली : Male Infertility | डॉक्टरांनुसार जेव्हा एखादा पुरुष एका वर्षात लागोपाठ संबंध ठेवूनही पिता बनू शकत नाही तेव्हा यास इनफर्टिलिटी (Male Infertility) किंवा वंध्यत्व म्हणतात. यासाठी महिला आणि पुरुष दोघांची तपासणी करणे आवश्यक असते. इनफर्टिलिटीची पुरूषांमध्ये अनेक कारणे असतात. ही कारणे कोणती ते जाणून घेवूयात…

 

पुरुषांमधील इनफर्टिलिटीची प्रमुख कारणे – Major causes of infertility in men

– पर्यावरणात वाढत आहेत टॉक्सिन

एका संशोधनानुसार, पर्यावरणातील वाढते प्रदूषण पुरुषांची प्रजनन क्षमता कमी करत आहे. पर्यावरणात जेवढे टॉक्सिन वाढतील तेवढी ही समस्या वाढेल.

– 60 वर्षात 50 टक्के घसरली शुक्राणुंची संख्या

1992 च्या एका संशोधनातून स्पष्ट झाले की, मागील 60 वर्षात पुरुषांमध्ये शुक्राणुंची संख्या 50 टक्केपर्यंत घसरली आहे.

– शुक्राणुंच्या घनत्वात 60 टक्के घट

2017 मध्ये आलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले होते की 1973 पासून 2011 च्या दरम्यान पुरुषांच्या शुक्राणुंच्या घनत्वामध्ये (sperm concentration) सुद्धा 50 ते 60 टक्केची घट झाली आहे. एक सामान्य पुरुषात शुक्राणुंचे स्पर्म कन्स्टेशन प्रति मिलीलीटर 1.5 कोटी ते 20 कोटी असावे.

– हार्मोनमध्ये होतोय बिघाड

अनेक संशोधनात म्हटले आहे की, पुरुषांमध्ये अंतःस्त्रावी ग्रंथी -इंडोक्राइन (endocrine) प्रभावित होत आहे ज्यामुळे प्रजनन संतुलित करणारे हार्मोन बिघडत आहे.

– प्लास्टिकमधून निघणारे रसायन हानिकारक

याचे मुख्य कारण प्लास्टिकमधून निघणारे हानिकारक रसायन प्लास्टिसायजर ( Plasticisers ) आहे. म्हणजे प्लास्टिक प्रजजन क्षमता खुप प्रभावित करत आहे. जसे हर्वोसाईड (Herbicides) पेस्टीसाईड (pesticides) असतात, त्याचप्रमाणे प्लास्टिकमधून निघणारे हानिकारक रसायनांना प्लास्टिसायजर म्हणतात.

– एयर पॉल्यूशनमुळे बिघतेय स्पर्मची क्वालिटी

एयर पॉल्यूशनमुळे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर हानिकारक टॉक्सिन स्पर्मची क्वालिटी खराब करण्यासाठी जबाबदार आहेत.

– डिव्हाईसमुळे स्पर्मची गुणवत्ता होतेय खराब

याशिवाय लॅपटॉप, सेलफोन, मॉडेम सुद्धा स्पर्मची गुणवत्ता खराब करण्यास जबाबदार आहेत. यातून निघाणारे रेडिएशन स्पर्मची गती आणि आकार खराब करतात.

– फूड्समधील हेवी मेटल हानिकारक

फूड्समधील हेवी मेटल कॅल्शियम, लेड, आर्सेनिक, कॉस्मेटिक इत्यादी स्पर्मच्या हेल्थसाठी खुप हानिकारक आहे.

Web Title : Male Infertility | apart from lifestyle many other factors are declining male fertility

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mahindra Thar 12 नव्हे, अवघ्या 6 लाखात खरेदी करा; वॉरंटीसह 100 % फायनान्स देईल कंपनी, जाणून घ्या

Income Tax | पेन्शनचे उत्पन्न असलेल्या 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना भरावा लागणार नाही ITR, फॉर्म नोटिफाईड

Geliose Hope | 20 पैसे प्रति किमी खर्चात धावते ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर, 5 हजार रु. डाऊनपेमेंट करून घरी घेऊन या