Malegaon Bomb Blast Case | मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्याची संशयित आरोपी समीर कुलकर्णीची मागणी, खटल्याचे कामकाज लांबविल्याचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील (Malegaon Bomb Blast Case) संशयित आरोपीने (Suspected Accused) या खटल्याची दैनंदिन सुनावणी (Daily Hearing) घेतली जावी अशी मागणी केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात (Malegaon Bomb Blast Case) समीर कुलकर्णी (Sameer Kulkarni) हा संशयित आरोपी आहे. सोमवारी (दि.24) समीर याने खटल्याची दैनंदिन सुनावणी करण्याची मागणी करत सरकार पक्षाकडून जाणीवपूर्वक कामकाज लांबविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पत्रकारांशी बोलताना केला.

मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Bomb Blast Case) खटला 13 वर्षे प्रलंबित आहे. या प्रकरणामध्ये एकूण 12 आरोपी असून त्यापैकी 5 जणांना विशेष न्यायालयाने (Special Court) दोषमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) केला आहे. यानंतर हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला. सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय साठमारीमुळे हा खटला 13 वर्षे प्रलंबित आहे. या खटल्यामध्ये एकूण 223 साक्षीदार असून साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तर काही साक्षीदार दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेले आहेत. एकंदरीतच या खटल्याचे कामकाज जाणीवपूर्वक लांबविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कुलकर्णी याने केला आहे.

 

या खटल्याच्या सुनावणीसाठी मी नियमित पुण्यातून (Pune) मुंबई (Mumbai) येथील विशेष न्यायालयात जात आहे. खटल्याच्या कामकाजावर लाखो रुपये खर्च झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी आठवड्यापूर्वी या खटल्याच्या कामकाजास एटीएस अधीकारी यांनी नियमीत उपस्थित रहावे तसेच राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकिलांच्या (Special Public Prosecutor) नियुक्तीची घोषणा केली आहे. याचीही लवकर पुर्तता करावी असे कुलकर्णी याने म्हटले आहे.

 

Web Title :-  Malegaon Bomb Blast Case | Accused Sameer Kulkarni demands daily hearing of Malegaon bomb blast case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा