Malegaon Bomb Blast Case | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; साध्वी प्रज्ञासिंह आणि समीर कुलकर्णी यांच्याकडून दोषमुक्तीची याचिका मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मालेगावात 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील (Malegaon Bomb Blast Case) आरोपी खासदार साध्वी प्रज्ञासिंह आणि समीर कुलकर्णी यांनी दोषमुक्तीच्या मागणीसाठी केलेली याचिका मागे घेतली आहे. या खटल्याशी संबंधित 200 पेक्षा जास्त साक्षीदारांचे पुरावे नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणात दोषमुक्तीच्या याचिकांवर सुनावणी घेतली जावी का, असा प्रश्न उच्च न्यायालयाने केल्यावर खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह आणि समीर कुलकर्णी यांनी दोषमुक्तीसाठी (Malegaon Bomb Blast Case) केलेली याचिका मागे घेतली आहे.

 

दुसरीकडे या प्रकरणातील आणखी एक प्रमुख आरोपी ले. कर्नल प्रसाद पुरोहित याच्या दोषमुक्तीच्या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 288 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. खटला सुरू होण्यापूर्वी पुरोहित, कुलकर्णी आणि साध्वी प्रज्ञासिंह यांनी प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्यांतर्गत (एनआयए) विशेष न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावत खटल्याला सुरुवात केली होती. त्यानंतर आरोपींनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत, आवश्यक मंजुरीविना आपल्यावर कारवाई केल्याचा दावा केला होता. पण, उच्च न्यायालयाने प्रश्न केल्यावर त्यांनी याचिका मागे घेतली आहे. त्यांच्यावर विशेष न्यायालयात खटला सुरू आहे.

 

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
यावेळी न्यायालयाने या टप्प्यावर हा खटला मागे घ्यावा का, अशी विचारणा केल्यावर प्रज्ञासिंह आणि कुलकर्णी यांनी याचिका मागे घेतली.
न्यायालयानेदेखील त्यांना याचिका मागे घेण्यास परवानगी दिली आहे.

 

Web Title :- Malegaon Bomb Blast Case | plea of acquittal of two accused including sadhvi pragya singh is withdrawn in the 2008 malegaon blast case mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Virat Kohli | विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर

Shweta Tiwari | श्वेता तिवारीने ‘तो’ फोटो शेअर करताच नेटकरी संतापले; म्हणाले लाज वाटते का…..

Nora Fatehi | अभिमानास्पद! ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा; सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव