‘कोरोना’ संकटादरम्यान मालेगावात 2 महिलांचा ICU मध्ये मृत्यू

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबई पाठोपाठ मालेगाव आता व्हॉटस्पॉट होऊ लागले असून मंगळवारी पहाटे कोरोना बाधित असल्याच्या संशयित दोन महिलांचा मृत्यु झाला आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. मालेगावच्या सामान्य रुग्णालयात आज पहाटे या महिलांचा मृत्यु झाला. या महिलांना न्युमोनिया, श्वसनाचा, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता.

त्यातील एक महिला ५८ वर्षाची मालेगाव शहरातील असून दुसरी महिला नांदगाव तालुक्यातील आहे. तिचे वय ४८ वर्षाचे असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही महिला शनिवारी मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्या घशाच्या स्वॅबचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला आहे. आज त्यांचा अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच त्यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.