कृषीमंत्रीपद सोडण्यास दादा भुसे ‘रेडी’, पण खडसेंसाठी…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे हे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, त्यांना नेमके कोणते पद द्यायचे यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेला नाही. मंत्रिमंडळात बदल करुन शिवसेनेकडे असलेले कृषी मंत्रिपद खडसेंना दिले जाणार असल्याची चर्चा होत आहे. त्यावर आपण कृषी मंत्रिपद सोडण्यास तयार असून, पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य असल्याचे मत कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला बोलताना दादा भुसे यांनी सांगितलं की, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व अधिकार आहेत. त्यांनी जो निर्णय घेतील, जो आदेश देतील त्यांचे पालन करणे हे शिवसैनिकाचे काम आहे आणि दादा भुसे एक शिवसैनिक आहे,” असे ते म्हणाले. मात्र, कृषी मंत्रिपद हे जनतेसोबत थेट संपर्कात येत असल्याने शिवसेना हे खाते सोडण्यास तयार नसल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं की नियोजन मंडळावर त्यांची वर्णी लावायची, यासंदर्भात महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. कारण, शिवसेना कृषी मंत्रिपद सोडण्यास तयार नसल्याचं कळत आहे. तर जितेंद्र आव्हाड सुद्धा आपल्याकडे असलेले गृहनिर्माण खाते खडसेंना देण्यास तयार नसल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेवर दबाव आणून…

भाजपला हा राज्यातील ठाकरे सरकारचा मोठा शत्रू आहे. म्हणून भाजपला नामोहरम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेवर दबाव आणून, कृषी खात्यावर खडसेंची वर्णी लावण्यासाठी प्रयत्नशील असेल, असे मत राजकीय विश्लेषक संजय भोकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला बोलताना व्यक्त केलं. तसेच शिवसेना कृषी मंत्रिपद सोडण्यास तयार झाली नाहीतर मधला मार्ग काढून खडसेंना नियोजन मंडळावर घेण्यात येईल, असे सुद्धा त्यांनी सांगितलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like