मालेगाव : व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाईन

मुले पळवणारी टोळी आली असल्याची अफवा पसरवणाऱ्या एका विरुद्ध मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अनिल शेरेकर यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

अनिल शेरेकर यांच्या फिर्यादेवरुन अनिल धवरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B0783HZ6LZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c0d2d3c2-81eb-11e8-8ad1-bfefab832ebe’]

अनिल शेरेकर यांच्या फिर्य़ादेनुसार, नितीन भाऊ आस्टे समर्थक या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आरोपी अनिल धिवरे याने १ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अफवा पसरवणारा मेसेज ग्रुपमध्ये शेअर केला. तसेच एक व्हिडीओ ग्रुपमध्ये शेअर करुन नागरिकांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला. पोलीस शिपाई अनिल शेरेकर या ग्रुपचे सदस्य आहेत. त्यांनी हा मेसेज वाचल्यानंतर गुरुवारी (दि.५) रात्री आरोपी विरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास मालेगाव कॅम्प पोलीस करीत आहेत.