इंदापूर तालुक्यातील माळी समाजाच्या हाती भावी आमदाराचं ‘भवितव्य’

इंदापूर :पोलीसनामा ऑनलाइन – आगामी २०१९ विधानसभेच्या दृृष्टीकोणातुन इंदापूर विधानसभा मतदार संघातील जातीनिहाय मतदान संखेंचा विचार केल्यास इंदापूर तालुक्यात मराठा समाजाचे मतदान प्रथम क्रमांकावर आहे, तर धनगर समाजाचे मतदान दुसर्‍या क्रमांकावर असुन माळी समाजाचा मतदान संखेच्या बाबतीत तीसरा क्रमांक लागतो. मतदान संखेच्या बाबतीत तीसर्‍या क्रमांकावर असणार्‍या माळी समाजाचा इंदापूर तालुक्यातील राजकीय पुढार्‍यांनी आजपर्यंत केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी व मतदानासाठी हातातल्या बाहुल्या सारखा वापर करून घेतल्याने माळी समाजाची स्थिती जैसे थी च आहे. परंतु येत्या विधानसभेला माळी समाज गाफील न राहता एकदीलाने एकत्र येणार असुन माळी समाज ठरवील तोच उमेदवार भावी आमदार होणार असल्याने आगामी विधानसभेच्या भावी आमदाराचे भवितव्य माळी समाजाच्या हाती असल्याचे पत्रकार सुधाकर बोराटे यांनी सांगीतले.

 

निमगाव केतकीमध्ये लवकरच माळी समाजाची बैठक

 

सुधाकर बोराटे म्हणाले की आगामी काळात विधानसभा निवडणूकीच्या अणूषंगाने माळी समाजाची मोठी बैठक निमगाव केतकी येथे होणार असुन बैठकीसाठी तालुक्यातील सर्व पक्षीय माळीसमाजाचे नेते,सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात माळीसमाज उपस्थित राहणार असुन बैठकीत विधानसभा मतदानाच्या बाबतीत महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. समाजाला आश्वासने देवून समाजाची फसवणूक करणार्‍या पुढार्‍यांना त्यांची जागा दाखवून योग्य उमेदवार निवडून आणण्यासाठी माळी समाज निर्णायक मतदान करण्याची भुमीका घेणार असल्याची माहीती पत्रकार सुधाकर बोराटे यांनी इंदापूर येथे बोलताना दीली

राजकारण्यांनी केवळ स्वार्थासाठी केला माळी समाजाचा वापर

माळी समाज ठरविल तोच आमदार निवडून आणण्यासाठी माळी समाजाच्या मतदानात धमक असुन आजपर्यंत तालुक्यातील राज्यकर्त्यांनी व लोकप्रतिनिधींनी माळी समाजाची फसवणूक करून व खोटी आश्वासने देवुन मतांसाठी समाजाचा नुसता वापर करून घेतला. व स्वत:ची पोळी भाजुन घेण्याचे काम केलेले आहे .परंतु अत्ता माळी समाज पूर्ण जागा व एकसंघ झालेला आहे. इथुन पुढच्या काळात माळी समाजाची फसवणूक करणार्‍या नेतेमंडळी व लोकप्रतिनिधींच्या भुलथापांना बळी न पडता त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करण्यासाठी तयारीला लागला आहे.

माळी समाजाचे निर्णायक मतदान ठरविणार भावी आमदार

तर माळी समाजाचे मतदान हे विधानसभेला निर्णायक ठरणार आसुन, माळी समाज ज्यांच्या पाठीशी उभे राहील तोच उमेदवार इंदापूर तालुक्याचा भावी आमदार ठरणार असल्याने भावी आमदाराचे भवितव्य माळी समाज्याच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे सुधाकर बोराटे यांनी सांगीतले.

Visit : Policenama.com