Malicious Apps | सावधान ! तात्काळ आपल्या फोनमधून DELETE करा ‘हे’ 8 अ‍ॅप, Google ने केले बॅन; जाणून घ्या लिस्ट

नवी दिल्ली : Malicious Apps | मागील काही महिन्यात क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मध्ये लोक खुप रस दाखवत आहेत. याचा फायदा हॅकर्स (Hackers) घेत असून लोकांची ऑनलाइन लुटमार करत आहेत. ते यूजर्सला मॅलिशियस अ‍ॅप्स (Malicious Apps) इन्स्टॉल करण्यासाठी सांगत आहेत, ज्यामध्ये धोकादायक मालवेयर आणि अ‍ॅडवेयर (dangerous malware and adware) असतात. ते इन्स्टॉल करताच युजर्सचा डेटा हॅक होतो. परंतु गुगलने असे 8 अ‍ॅप्स शोधून ते प्ले स्टोअरवरून रिमूव्ह केले आहेत (Google removed 8 apps from Play Store). हे अ‍ॅप्स क्रिप्टोकरन्सी मायनिंग अ‍ॅप्स म्हणून दिसत होते.

सिक्योरिटी फर्म ट्रेंड माइक्रो (Trend Micro) ने आपल्या अ‍ॅनालिसिसवर अधारित रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हे 8 मॅलिशियस अ‍ॅप लोकांना अ‍ॅड्सच्या बहाण्याने फसवत होते, सबस्क्रीप्शन सर्व्हिसेससाठी पैसे भरत होते ज्याचे सरासरी मूल्य 15 डॉलर (जवळपास 1115 रुपये) आहे, आणि विना काही प्राप्त करता वाढलेल्या मायनिंग कॅपेबिलिटीजसाठी पेमेंट करत होते.

ट्रेंड मायक्रोने याबाबत माहिती गुगल प्लेला दिली आणि गुगलने ताबडतोब ते रिमूव्ह केले. परंतु ज्यांच्या फोनमध्ये अजूनही हे अ‍ॅप आहेत त्यांनी ताबडतोब डिलिट करण्याची आवश्यकता आहे.

हे आहेत ते 8 धोकादायक अ‍ॅप्स (Here are 8 dangerous apps) :

– BitFunds – Crypto Cloud Mining

– Bitcoin Miner – Cloud Mining

– Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet

– Crypto Holic – Bitcoin Cloud Mining

– Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System

– Bitcoin 2021

– MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner

– Ethereum (ETH) – Pool Mining Cloud

ट्रेंड मायक्रोने म्हटले आहे, अजूनही 120 फेक क्रिप्टोकरन्सी मायनिंग अ‍ॅप ऑनलाइन उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप्स केवळ जाहिराती दाखवण्यासाठी आहेत.

हे देखील वाचा

Olympian Footballer | ऑलम्पियन फुटबॉलर एस.एस. हकीम यांचे निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 197 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Malicious Apps | remove these 8 apps from your phone otherwise you will loose everything

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update