मलीहा लोधींनी केलं ‘पाक’ला पुन्हा ‘बेअब्रु’, इंग्लंडच्या पंतप्रधानांना संबोधलं विदेश मंत्री अन् नंतर माफी मागितली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी ट्विटरवर मोठी चूक केली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांचा उल्लेख परराष्ट्रमंत्री असा केला होता एका तासानंतर त्यांनी ट्विट काढून टाकले आणि त्याबाबत क्षमा मागितली.

अशी गंभीर चूक करण्याची मलीहा यांची ही पहिलीच वेळ नाही या आधीही मलीहा यांच्यामुळे पाकिस्तानला बेअब्रू व्हावे लागले होते. 2017 मध्ये त्यांनी एका जखमी मुलीचा फोटो दाखवत सांगितले होते की हा काश्मीरमधील क्रूर हिंसेचा पुरावा आहे.

काय होते याबाबतचे सत्य ?
खर तर तो फोटो फिलिस्तीनी एका मुलीचा होता ती मुलगी गाजामध्ये इस्राईच्या हल्ल्यात जखमी झाली होती. एवढेच नाही तर हा फोटो 2014 च्या पुरस्कार विजेते फोटो ग्राफर हेदी लेवीन यांनी काढलेला होता.

इम्रान खान यांनी बालाकोट हल्ल्यातील एअरस्ट्राईक केले मान्य

इतक्या दिवसांपासून पाकिस्तान भारताने बालाकोट हल्ला केलाच नाही असे म्हणत होता. मात्र  संयुक्त राष्ट्र संघात बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबत खुलासा केला आहे. भारताने पाकिस्तानमधील बालाकोटवर केलेल्या एअरस्ट्राईक बद्दल इम्रान खान यांनी मान्य केले आहे. यावेळी बोलताना खान यांना  अनेक लज्जास्पद प्रश्नाची उत्तरे द्यावी लागली.

काश्मिरातील कलम 370 रद्द केल्याच्या निर्णयावर इम्रान खान म्हणाले की, भारत RSS च्या अजेंड्यावर सध्या काम करत आहे. जेव्हा कोणी बाहेरचा याबाबत बोलू इच्छितो तेव्हा भारत म्हणतो का हा द्विपक्षीय मुद्दा आहे मात्र पाकिस्तानसोबत यावर चर्चा करत नाही. मी यूएन ने याबाबत दखल देण्याबाबत बोलणार आहे इम्रान खान यांनी यावेळी सांगितले.