मी लोकांना भेटण्यासाठी तयार आहे, कधी येऊ ते सांगा ? राहुल गांधींचा काश्मीरच्या राज्यपालांना ‘सवाल’

नवी दिल्ली वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील शाब्दिक युद्ध शमताना दिसत नाही. राहुल गांधी यांनी पुन्हा ट्विट करत सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत काश्मीर खोऱ्यात कधी येऊ हे सांगा असा प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी काश्मीरात यावं मी विमान पाठवतो असं विधान सत्यपाल मलिक यांनी केल्याने वादाला तोंड फुटलं होतं.

राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणतात, प्रिय मलिक जी, मी माझ्या ट्विटवर तुमची प्रतिक्रिया पाहिली. मी विनाअट लोकांना भेटण्यासाठी तयार आहे. मी कधी आणि केव्हा यायचं ?

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्ये काय चाललं आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असं आव्हान राहुल यांनी दिलं होतं. त्याला मलिक यांनी प्रत्युतर दिलं होतं. जम्मू-काश्मीरमध्ये हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मोदींनी पारदर्शकपणा दाखवून या प्रकरणी चिंता व्यक्त करायला हवी, अशी मागणी राहुल यांनी केली होती.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like