GST आणि ‘मंदी’चा पहिला बळी ! मुलीला व्हॉट्सअ‍ॅप मेसेस करुन उद्योजकांची आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनालाइन – औरंगाबदच्या सिडको वाळूज महानगर 1 मध्ये एक व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. साक्षीनगर विष्णू रामभाऊ काळवणे (राहणार मूळगाव फुलशेवरा. गंगापूर. वय 53) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. काळवणे डब्ल्यू सेक्टरमध्ये भाड्याच्या गाळ्यात श्री गणेश इंडस्ट्रीज या नावाने लघुउद्योग करत होते. जीएसटी थकल्यामुळे विष्णू काळवणे यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

जीएसटी थकबाकी आणि मंदीमुळे विष्णू काळवणे हे नैराशाच्या गर्तेत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना एक सुसाईड नोट देखील मिळाली आहे. एवढेच नाही विष्णू काळवणे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पुण्यात राहणाऱ्या मुलीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करुन आत्महत्या करत आहे असे सांगितले. मेसेज वाचल्यानंतर घाबरलेल्या मुलीने आपल्या भावाला पंढरपूरला कळवले. काळवणे यांच्या पत्नीने आणि मुलीने साक्षीनगरीत असलेल्या खोलीकडे धाव घेतली. परंतू तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.

काय होतं सुसाईड नोटमध्ये –
उद्योगातील मंदीमुळे उत्पादनात 50 टक्के कपात झाली. ऑर्डर कमी मिळतात. परंतू कुशल कामगारांना काम नसताना पूर्ण वेळेचा पगार द्यावा लागतो. त्यामुळे आर्थिक अडचणीत आले आहे. कमी उत्पादनामुळे खर्चाचा भार वाढत असल्याचे मागील वर्षभरापासून जीएसटी थकला आहे. जीएसटी अधिकाऱ्यांकडून कर भरण्यासाठी तगादा सुरु आहे. आर्थिक अडचणीमुळे जीएसटी भरण्यासाठी वेळ मागितला परंतू तो मिळाला नाही. त्यामुळे आत्महत्या करत आहे असा मेसेज विष्णू काळवणे यांनी आपल्या मुलीला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

विष्णू काळवणे कुटूंबीयांसह 20 वर्षांपूर्वीच वाळूजमध्ये आले होते. सुरुवातील मिळेल ते काम त्यांनी केले त्यानंतर डब्ल्यू – 52 सेक्टरमध्ये गणेश इंडस्ट्रीज या बफिंग शॉपला सुरुवात केली. येथे 10 कामगार काम करत होते. काही दिवसांपासून मंदीची परिस्थिती त्यांना हीनावत होती. त्यात शासनाकडून जीएसटीचा तगादा आणि नोटीसद्वारे शेवटची 27 नोव्हेंबर तारीख देण्यात आली होती. त्यामुळे नैराशात त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. जीएसटी आणि मंदीचा हा पहिला बळी मानला जात आहे.

Visit :  Policenama.com