Mallaika Arora-Arjun Kapoor | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरमध्ये वाद, नववर्षाच्या स्वागताला देखील सोबत नसणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Mallaika Arora-Arjun Kapoor | बोल्ड अदांसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या लव लाईफमुळे सतत चर्चेत असते. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. या जोडीला अनेकांनी भरभरुन प्रेम देखील दिलं आहे. मात्र या जोडप्यामध्ये वाद झाला असल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही तर नवीन वर्षाच्या स्वागताला देखील हे जोडपं एकत्र नसणार आहे. (Mallaika Arora-Arjun Kapoor)

 

मलायका आणि अर्जुन त्यांच्या नात्याबद्दल सामाजिक (Public) जास्त काही बोलत नसले तरी सोशल मीडियावर सतत एकत्र फोटो शेअर करत असतात.
लाॅकडाऊनमध्ये चित्रपटगृह (Theatres) बंद असल्याने सिनेसृष्टीतील कामे कमी गतीने चालत होती.
अशातच आता महाराष्ट्रातील चित्रपटगृहे चालू झाल्यापासून कामांना वेग आला आहे.

 

चित्रपटांची कामं वेगाने सुरु करण्यात आल्यामुळे अर्जुन कपूरला मलायका साठी वेळ नसून तो प्रचंड व्यस्त आहे.
अर्जुनने नुकतच मोहित सूरींची (Mohit Suri) ‘एक विलेन रिटर्न्स’ (Ek Villian Returns) चित्रपटाची शूटींग पुर्ण केली आहे.
त्यामुळे प्रचंड व्यस्त असल्यामुळे या वर्ष अखेरला (Year End) मलायका आणि अर्जुन एकत्र नसणार आहेत. (Mallaika Arora-Arjun Kapoor)

 

मलायका अरोरा आणि अर्जुनने दिवाळीमध्ये (Diwali) एकत्र प्रचंड धुमाकूळ घातला.
सगळे सण देखील एकत्र साजरे केले. मात्र या न्यू इअरला त्याने मलायकाला वेळ देण्यास नकार दिला आहे.
ज्यामुळे मलायका अर्जुनवर नाराज असल्याचं समजतं आहे. मलायकाने 17 वर्षांपुर्वी सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत विवाह पार पडला होता.
मात्र त्यांच्या होणाऱ्या सततच्या वादाने त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2017 पासून मलायका अर्जुनला डेट करत आहे.

 

Web Title : Mallaika Arora-Arjun Kapoor | mallaika arora upset with boyfriend arjun kapoor because of his busy schedule and shoots

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम.जी. एन्टप्रायजेसच्या डिंपल सोमजीला सशर्त जामीन

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराच्या भेटीला; चर्चेला उधाण

Punit Balan Group | युवा कलाकारांनी गाजवला ‘तालचक्र’ महोत्सवाचा दुसरा दिवस; बहारदार सांगीतिक मैफलीनी पुणेकर मंत्रमुग्ध