मल्लिका आणि रणशेरलांबाचा व्हिडीओ सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मल्लिका शेरावत नुकतीच चर्चेत आली होती. तिने नुकतंच कान्स फिल्म फेस्टीवल मध्ये हजेरी लावली होती. मल्लिकाने सुंदर आऊटफिटही केला होता. परंतु या ड्रेसमुळे मल्लिका ट्रोल झाली होती. तिने घातलेला ड्रेस याआधीच्या कान्स फेस्टीवलच्या वेळी परिधान केलेल्या ड्रेससोबत साधर्म्य राखणारा असल्याने मल्लिका ट्रोल झाली होती. यानंतर ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मल्लिकाच्या तिच्या पुतण्यासोबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे ती पुन्ही एकदा चर्चेत आली आहे.

कान्स फिल्म फेस्टीवलमधीलच या व्हिडीओ मध्ये दिसत आहेत. की मल्लिकाने तिचा पुतण्या रणशेरलांबाला कडेवर उचलून घेतले आहे. ती त्याला खेळवत आहे आणि त्याच्याशी गप्पा मारतानाही दिसत आहे. दोघेही खूप आनंदी दिसत आहे. रणशेरलांबाने लाल रंगाचं जॅकेट आणि डेनिम शार्ट परिधान केल्याचे दिसत आहे तर मल्लिकाने ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला आहे. मल्लिका खूपच सुंदर दिसत आहे. याच फेस्टीवलमधील रणशेरलांबासोबतचे तिचे काही फोटो आणि व्हिडीओज याआधीही समोर आले आहेत.

मल्लिकाचा हा समोर आलेला व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर एका अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या तीन तासांत या व्हिडीओला 30 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. मल्लिकाच्या चाहत्यांना हा व्हिडीओ चांगलाच आवडल्याचे दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

https://www.instagram.com/p/Bxw_M8DH_3-/

https://www.instagram.com/p/Bw_M7BdjkQ7/

https://www.instagram.com/p/BmGB_vYFzaT/

https://www.instagram.com/p/BhD6pwGHUDE/

https://www.instagram.com/p/Bd5c2qWnxzX/

https://www.instagram.com/p/BRpzJVsBb98/