आता मल्‍लिका शेरावतच्या केंद्रस्थानी ‘अध्यात्म’ आणि ‘स्वास्थ’, ‘हलासन’ आवडतं योगासन (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सेक्सी आणि हॉट अभिनेत्री जिने आपल्या सेक्सी अदाने चाहत्यांना फिदा केले आहे ती म्हणजे मल्लिका शेरावत. तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. सध्या ही अभिनेत्री बॉलिवूड-हॉलिवूडच्या दूनियेतून दूर जाताना दिसते आहे. मल्लिकाने गेल्या काही दिवसांत तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री मल्लिका योगासना करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B1IWg-hHdz-/

https://www.instagram.com/p/B0-GOlknIQb/

मल्लिका शेरावत हीने हलासनसोबतचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करुन मल्लिकाने लिहिले की, ‘ हलासन हा योगा माझ्या आवडत्या योगांपैकी एक आहे, जो मेंदूला शांत करतो, ताणतणाव कमी करतो आणि आराम देतो. ‘. मल्लिकाला जेव्हा जास्त वेळ चित्रपटाचे शूट करायचे असेल तेव्हा ती हा योगा करते. याने तिला काम करण्यास जास्त एनर्जी मिळते. त्याचबरोबर काम करण्यास उत्साह येतो.

https://www.instagram.com/p/ByZtHfRjAXM/

मल्लिकाच्या कामाबद्दल बोलायचे म्हणले तर ती जून 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बू-सबकी फटेगी’ या वेबसीरीजमध्ये दिसली होती. ही आल्ट बालाजीची यांची पहिली हॉरर कॉमेडी वेब सीरिज होती. यामध्ये तुषार कपूर, कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आले होते.

आरोग्यविषयक वृत्त –