Malpani’s Bakelite | गणपती-गौरी सजावट व प्रसाद स्पर्धेचे मालपाणीज् बेकलाईट करणार आयोजन

Malpani’s Bakelite | Malpani’s Bakelite to organize exciting and engaging ‘Ganpati-Gauri Sajawat & Prasad Contest’
ADV

प्रवेशिका सादर करण्याचा अंतिम दिवस – १७ सप्टेंबर २०२४; विजेत्यांना मिळणार एकूण १५ रोमांचक बक्षिसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Malpani’s Bakelite | अन्न प्रक्रिया आणि बेकरी क्षेत्रातील अग्रगण्य व विश्वासार्ह ब्रँड असलेल्या मालपाणीज् बेकलाईटने ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या श्री गणेशोत्सव उत्सवाचा एक भाग म्हणून पुणे आणि महाराष्ट्रातील सर्व परिवारांसाठी एका आकर्षक गणपती सजावट स्पर्धेची आज घोषणा केली.

गणेशोत्सवाच्या जल्लोषाचा एक भाग म्हणून, मालपाणीज् बेकलाईटच्या वतीने संपूर्ण उत्सवकाळात स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. “गणपती – गौरी सजावट आणि प्रसाद!” ही या स्पर्धेची मुख्य संकल्पना आहे. गणेशोत्सव हा पुण्याच्या समृद्ध संस्कृतीची शान असून या ऐतिहासिक आणि पारंपारिक उत्सवाला हा ब्रँड पाठिंबा देत आहे. या सजावटीच्या रूपाने आणि प्रसादाच्या स्वरूपात आपला समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परंपरेचे प्रतिबिंब पडेल अशा सर्जनशीलतेचा वापर करून प्रत्येकाने संस्मरणीय क्षण निर्माण करावेत, यासाठी हा ब्रँड प्रोत्साहन देतो.

प्रत्येकाने गणेशोत्सव अगदी पारंपारिक स्वरूपात साजरा करावा, यासाठी प्रामुख्याने प्रोत्साहन देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. कंपनीने गणपती / गौरींना अर्पण केलेल्या नैवेद्य / प्रसादाचा भाग असलेल्या कडबोळी, चकली, चिरोटे, शंकरपाळी आणि चिवडा इत्यादी उत्पादनांची विस्तृत श्रेणी बाजारात आणली आहे.

ही स्पर्धा सर्व व्यक्तींसाठी आणि कुटुंबांसाठी खुली असून ती फक्त घरी केलेल्या गणपतीच्या सजावटीसाठी लागू आहे.
क्लब हाऊस किंवा मंडळांमध्ये केलेली सजावट प्रवेशिका म्हणून स्वीकारली जाणार नाही. ही स्पर्धा ७ सप्टेंबर २०२४
रोजी सुरू होईल आणि १७ सप्टेंबर २०२४ रोजी संपेल.

सहभागाची प्रक्रिया:

• स्पर्धकांनी आपल्या गणपतीच्या सजावटीचे फोटो किंवा व्हिडिओ फेसबुक / इंस्टाग्राम /व्हॉट्सॲप वर तारीख आणि टाइम स्टॅम्पसह सबमिट करणे आवश्यक आहे.

  • स्पर्धकांनी आपले नाव, संपर्क तपशील आणि सजावटीचे संक्षिप्त वर्णन नमूद करावे.
  • प्रति व्यक्ती किंवा कुटुंबाला केवळ एक प्रवेशिका सादर करता येईल.
    •सबमिशन पूर्ण करण्यासाठी सहभागींनी मालपाणीज् बेकलाईटच्या सोशल मीडिया पेजेसला फ़ॉलो करत असल्याचे निश्चित करावे. आपल्या पोस्टमध्ये आमच्या अधिकृत खात्यांना टॅग केले असल्याची खात्री करा. सहभागासाठी सोशल मीडिया हँडल:
    •इंस्टाग्राम हँडल – malpanis_bakelite
    •फेसबुक हँडल – Malpani’s Bakelite
    •व्हॉट्सॲप क्रमांक – 9096500606
    • पोस्टसाठी हॅशटॅग: #mybappa #mybappaandme #mybappaandprasad #mybappasblessings #bappakaprasad #mybappaandsajawat

सर्जनशीलता, पर्यावरणास अनुकूल सामग्रीचा वापर आणि संकल्पनेचा आधार या निकषांवर स्पर्धकांची निवड केली जाईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | हडपसर: मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही केल्याने ज्येष्ठाचे अपहरण करुन बेदम मारहाण; 7 जणांवर गुन्हा दाखल

Dhananjay Munde On Sharad Pawar | शरद पवारांच्या टीकेला मंत्री धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – ” महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला…”

Total
0
Shares
Related Posts