CCDच्या 18 हजार कोटींच्या व्यवसायाची धुरा कोण सांभाळणार, ‘यांचं’ नाव आघाडीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध कॉफी आऊटलेट्स सीसीडीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर सीसीडीचे काय होणार याची चर्चा सुरु झाली होती, त्यानंतर आता माहिती येत आहे की त्यांच्या पश्चात असलेल्या त्यांच्या पत्नी मालविका या कंपनीची सूत्रे सांभाळणार आहेत. मालविका या आधीपासूनच कंपनीच्या बोर्डावर आहेत. परंतू त्या पतीच्या मृत्यूच्या धक्क्यात असल्याने कंपनीची सूत्र लगेचच हाती घेतील का यावर शंका उपस्थित होत आहे.

कोण आहेत मालविका 

मालविका या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची मुलगी आहे. त्यांचे बंगळुरु विद्यापीठातून इंजिनिअरिंग झाले आहे. व्ही. जी. सिद्धार्थ हे एस. एम. कृष्णा यांचे जावई आहेत. मध्यंतरी चर्चा सुरु झाली होती की टाटा ग्लोबल, बेव्हरेजेस अ‍ॅण्ड ज्युबिलियंट फूडवर्क्स आणि कोकाकोला या कंपन्या सीसीडी विकत घेण्यास इच्छूक आहेत. कोकाकोलाची तर सीसीडी बरोबर आधीपासूनच बोलणी सुरु आहेत.

चाय पॉइंट, एम कॅफे, बरिस्ता या ब्रँड्सनी सीसीडी समोर आव्हान निर्माण केले आहे. या स्पर्धेमुळे सीसीडीने २०१८ सालीच ९० छोटे स्टोअर्स बंद केले आहेत. यानंतर देखील कंपनीला २२ कोटींपेक्षा आधिक तोटा सहन करावा लागला.

सध्या टाटाचे अमेरिकन चेन स्टारबक्सबरोबर जॉइंट व्हेचर आहे. यामुळे जर टाटाने सीसीडी विकत घेतले तर टाटाच्या स्टारबक्सचा आणखी विस्तार वाढेल. त्यामुळे आता कोकाकोला की टाटा, कोण सीसीडी विकत घेणार हे पाहावे लागेल. की सीसीडी स्वत:च आपले स्टोर सूरु ठेवाणार हे देखील लवकरच स्पष्ट होईल.

आरोग्यविषयक वृत्त