Mamata Banerjee And PM Modi | ‘पश्चिम बंगालचं नाव बदला’ ! ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या मुख्यमंत्री पदावर हॅट्रीक करणा-या पश्चिम बंगालच्या (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज (मंगळवारी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट दिल्लीत घेतली आहे. आताच्या झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी कोणत्याही विषयावरून परस्परावर जोरदार टीका केली होती. त्या निवडणुकीनंतर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट (Mamata Banerjee meet PM Narendra Modi) घेतली आहे.

 

 

पंतप्रधान मोदी आणि ममता यांच्यात जवळजवळ अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते. तर, या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘ही केवळ औपचारिक भेट होती. या भेटीत मी कोव्हिड आणि राज्यातील कोरोना लसी आणि औषधांचा मुद्दा उपस्थित केला आहे. याव्यतिरिक्त अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या पश्चिम बंगालच्या नामांतराचा मुद्दा देखील मी मांडला आहे.
या मुद्द्यावर ‘मी बघतो’ असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं असल्याची माहिती स्वतः ममता यांनी दिली आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सलग तीनवेळा मुख्यमंत्री पदाची दावेदार झाल्यांनतर ममता बॅनर्जी यांनी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आहे.
त्याअगोदर सीएम ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
मात्र पंतप्रधान मोदींची ममता यांनी प्रथमच भेट घेतली आहे.

Web Titel : Mamata Banerjee And PM Modi | west bengal cm mamata banerjee met prime minister narendra modi in delhi today discussed change of name of the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bhosari Crime | ‘त्या’ खुन प्रकरणात गोल्डनमॅन दत्ता फुगेच्या मुलासह दोघांना अटक, प्रचंड खळबळ

Tokyo Olympic 2020 | ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याच्या आनंदात महिला अ‍ॅथलीटच्या तोंडातून निघाली ‘शिवी’, पाहा व्हायरल व्हिडीओमध्ये काय म्हणाली ती

Rain in Maharashtra | आगामी 5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

Gold Price Today | सोन्याच्या दरात 123 रुपयांची ‘घसरण’, चांदी झाली 206 रुपये ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर