PM मोदींनंतर ममता बॅनर्जींची मोठी घोषणा ! बंगाल सरकार जून 2021 पर्यंत देईल ‘मोफत’ रेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (30 जून) संध्याकाळी 4 वाजता देशाला संबोधित केले. गरिबांसाठी मोफत रेशन योजनेची नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ त्यांनी दिली. पंतप्रधानांच्या या घोषणेचे सर्वत्र कौतुक होत आहे, त्याच वेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या. त्यांनी राज्यात मोफत रेशनची योजना पुढील वर्षाच्या जूनपर्यंत सुरू ठेवण्याची घोषणा केली. 1 जुलैपासून राज्यात अनलॉक-2 सुरु होणार असून त्यासाठी अनेक सूट देण्याची माहितीही ममता बॅनर्जी यांनी दिली. त्याबरोबरच खासगी बस चालकांना भाडे वाढविण्याची मागणी सोडून देण्याचा इशारा त्यांनी दिला.

1 जुलैपासून देशात अनलॉक-2 लागू करण्यात येत आहे. याबाबत केंद्र सरकारने सोमवारीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तथापि, अनलॉक-1 प्रमाणे अनलॉक-2 मध्ये देखील राज्यांना सवलत देण्यात आली आहे की ते त्यांच्या गरजेनुसार केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करू शकतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी या आधारे राज्यात काही अतिरिक्त सूट देण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये 5 मुख्य गोष्टी आहेत.

1. बंगालमध्ये मॉर्निंग वॉक सकाळी 5.30 ते 8.30 पर्यंत करण्यास सूट देण्यात आली आहे. हे करत असताना सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळले गेले पाहिजेत.

2. राज्यात होणाऱ्या विवाहसोहळ्यांमध्ये 50 लोक एकत्र येण्यास परवानगी आहे. तसेच श्राद्ध असल्यास 25 लोक एकत्र येऊ शकतात.

3. सीएम ममता बॅनर्जी यांनी खासगी बस चालकांना 24 तासात बस सुरू करण्यास सांगितले आणि भाड्यात वाढ न करण्याचा इशारा दिला.

4. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बस चालकांनी असे न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत त्यांच्या बस जप्त केल्या जातील.

5. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की खाजगी बसेस जप्त केल्यानंतर सरकार आपल्या ड्रायव्हरची नेमणूक करेल आणि बसेस चालवेल. त्यामुळे फायद्याचे हेच आहे की खाजगी बस चालकांनी आपला अहंकार कमी करुन बस चालवाव्यात. ही वेळ पैसे कमावण्याची नाही.