ममता बॅनर्जींकडून ‘बंगाली’ अस्मितेचा मुद्दा, प. बंगालमध्ये बंगाली ‘बोलता’ आलीच पाहिजे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये निवडणूकापार पडल्या तरी राजकीय नाट्य अजूनही सुरुच आहे. भाजपला पश्चिम बंगालमध्ये पक्षाचा विस्तार करायचा आहे. तर ममता बॅनर्जी देखील शांत न राहता भाजपला बंगालमध्ये रोखण्यासाठी वेगवेगळ्या अस्त्रांचा वापर करत आहे. आज नॉर्थ २४ परगनामध्ये ममता बॅनर्जी यांनी सभा घेत लोकांना संबोधित करताना सांगितले की बंगालला गुजरात होऊ देणार नाही.

बंगालमध्ये बंगाली बोलताच आली पाहिजे
ममता बॅनर्जी म्हणाल्या की आम्ही बंगालमध्ये बांग्ला भाषेला प्रोस्ताहन देणार आहोत. जेव्हा मी बिहार, यूपी किंवा पंजाबला जाते तेव्हा मी त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तुम्ही जर बंगालमध्ये आलात तर तुम्हाला देखील बंगाली बोलता आली पाहिजे. पुढे त्या म्हणाल्या की असे आजिबात सहन केले जाणार नाही की बंगालमध्ये कोणी गुंड असे बाईकवर फिरेल.

सध्या भाजप आणि टीएमसीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. एकमेकांना वेळीच रोखण्यासाठी दोन्ही पक्ष युक्त्या लढवत आहे. निवडणूकीपासून येथे हिंसा सुरु आहे. यात अनेक कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर आता लवकरच २०२१ ला विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. त्यासाठी निवडणूकीचा मुद्दा दोन्ही पक्ष शोधत आहेत.

यासाठी भाजपने आता पक्षासाठी सदस्यता अभियान सुरु केले आहे. या अभियानावर भाजपचा फोकस आहे, जेणे करुन जास्तीत जास्त लोक भाजपमध्ये सहभागी होऊ शकतील आणि भाजपची पश्चिम बंगालमधील ताकद वाढेल. त्यालाच विरोध म्हणून बंगालमध्ये भाषिक आस्मिता जागरुक करण्यासाठी ममता बॅनर्जींंनी बंगालमध्ये बंगाली बोलता आली पाहिजे हा मुद्दा उचलून धरण्यास सुरुवात केली आहे.

सिने जगत –

#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……