हिंमत असेल तर मोदींनी ‘येथून’ निवडणूक लढवावी : ममता बॅनर्जी

कोलकाता : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमधून लढवावी असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले आहे. बंगालचे मतदान केंद्र अत्यंत संवेदनशील असल्याने मोदींनी बंगालला येताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यासारख्या आपल्या राजकीय सेनांनाही येथे आणावे. जनता त्यांना निरोप देईन, असा टोलाही लगावला.

मोदींना आव्हान देताना ममता बॅनर्जीं म्हणाल्या की, ‘मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवावी. मात्र  मोदींनी हा निर्णय घेतला तर नोटाबंदीप्रमाणे त्यांचे हे पाऊल अपयशी ठरेल. त्यांना जनतेच्या न्यायालयात दंडित केले जाईल. कोणीही कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मी पण वाराणसी मतदारसंघातून लढू शकते. पण जर ते बंगालमधून लढले तर त्यांची अवस्था नोटाबंदीसारखी होईल. त्यांनी देशाचे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना लोकांना उत्तर द्यावे लागेल. त्यांनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढल्यास आम्हाला खूप आनंद होईल. जर त्यांना एका मतदारसंघाची भीती वाटत असेल तर त्यांनी सर्वच ४२ जागांवरुन निवडणूक लढवावी.’

आणखी एका सर्जिकल स्ट्राईकसाठी निवडणूक लांबवली –

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंगालला त्रास देण्यासाठी आणखी एका हल्ल्याचा कट भाजपाने आखला असून त्यासाठीच येथील निवडणुका लांबवल्या जात असल्याचं म्हटलं आहे. तसेच ‘कृपया माझे म्हणणे चुकीच्या पद्धतीने मांडू नका कारण, निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थेचा मी सन्मान करते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये वातावरण बिघडवण्याचा भाजपाचा डाव आहे’ असे ममता बॅनर्जी यांनी काल एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न-

काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी केला होता. तृणमूलच्या नेत्यांनी पक्ष सोडावा, भाजपात सामील व्हावं, यासाठी पैशांच्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यासाठी राज्याबाहेरुन पैसा आणला जात आहे, असा सनसनाटी आरोप बॅनर्जींनी केला होता.

ह्याही बातम्या वाचा –  

पुण्यात छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार 

दारु पिण्याच्या वादातून खडकी बाजारमध्ये खुन 

अमेरिकेतील अभियंत्याने लग्नाच्या अमिषाने महिलेला घातला १७ लाखाचा गंडा 

मी बारामती जिंकून दाखवेल : गिरीश महाजन