Mamata Banerjee | ममता बॅनर्जी अ‍ॅक्शन मोडमध्ये ! घोटाळ्यात नाव येताच पार्थ चॅटर्जींची मंत्री पदावरून हकालपट्टी

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल (West Bengal) मधील शिक्षक भर्ती घोटाळ्यात (Teacher Recruitment Scam) नाव आल्याने ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राज्याचे उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी (Industries Minister Partha Chatterjee) यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. गुरूवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

 

पश्चिम बंगालमध्ये मोठा शिक्षक भर्ती घोटाळा उघडकीस आला ज्यात पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) यांचे नाव समोर आले. ईडीने (ED) यापूर्वीच दोघांना अटक (Arrest) देखील केली होती. अर्पिताच्या घरी ईडीने छापा देखील मारला होता त्यावेळी 20 करोड रूपये कॅश मिळाली होती. चॅटर्जी ज्यावेळेस शिक्षण मंत्री होते त्यावेळेस हा घोटाळा झाला होता.

गुरुवारी बंगालच्या मुख्य सचिवांकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हंटले आहे की,
चॅटर्जी यांना उद्योग मंत्री पदावरून हटविण्याबरोबरच इतर पदांवरून देखील हटविण्यात आले आहे.

 

सोमवारी पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक
पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) काही वेळापूर्वीच संपली.
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सोमवारी पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.
महत्वाचे म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक ही प्रत्येक दोन आठवड्यांनी होते.
मात्र, आजच्या बैठकीनंतर सोमवारी पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे.

 

Advt.

Web Title : – Mamata Banerjee | partha chatterjee removed from mamata banerjee bengal cabinet

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा