कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या पायाला प्लॅस्टर बांधून फिरत आहेत. परंतु एका व्हिडिओत त्या तोच पाय सहजपणे हलवताना दिसून आल्या. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, टीएमसी सुप्रीमो एका टेबलसमोर खुर्चीवर बसल्या आहेत आणि अगदी सहजपणे आपला तो पाय वर-खाली करत आहेत, ज्यास त्यांना दुखापत झाल्याचे म्हटले गेले आहे. यापूर्वी 1 दिवसातच त्यांनी प्लॅस्टर बदलून गरमपट्टी करून घेतली होती.
यात दिसून येत आहे की यावेळी ममता बॅनर्जी यांना कोणताही त्रास होत नाही. विरोधकांचे म्हणणे आहे की, जर त्यांना असे करताना वेदना झाल्या असत्या तर त्यांनी पाय हलवणे थांबवले असते किंवा तिकडे लक्ष दिले असते. परंतु, असे काही झाले नाही. व्हिडिओत एक क्षण असा येतो, जेव्हा त्या दुसरा पाय जखमी पायावर टाकून बसतात आणि तरी त्यांना कोणताही त्रास होताना दिसत नाहीत.
भाजपा नेते विष्णुवर्धन यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी यांनी लोकांना जी कथा सांगितली आहे, हा व्हिडिओ वेगळीच कथा सांगत आहे. मुंबई भाजपाचे प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी विचारले की, आपल्या तुटलेल्या पायाशी असे कुणी खेळू शकते का? एका अन्य व्हिडिओत सुद्धा त्या सहजपणे व्हिलचेयरवरून उभ्या राहताना दिसत आहेत. नंतर सांगितले गेले की, राष्ट्रगीतादरम्यान त्यांना बसणे चांगले वाटले नाही, यासाठी त्या उभ्या राहिल्या.
Look at Didi 's feet between 35 to 40 second. 😂😂 pic.twitter.com/iu7gZbYw8q
— Vaibhav (@1997Indian) April 2, 2021
यापूर्वी 13 मार्चला सुद्धा त्यांच्या पायाला प्लॅस्टरऐवजी बँडेज पाहून सुद्धा विरोधकांनी विचारले होते की, ही खरोखरच गंभीर दुखापत होती का, जसे सांगण्यात आले? विरोधक म्हणाले होते एका दिवसात प्लॅस्टरवरून बँडेज झाले, हेच खरे ‘आसोल परिवर्तन आहे’, अच्छे दिन’ आहेत. एका विरोधकाने ममता बॅनर्जी यांची तुलना हॉलीवुड चित्रपटातील कलाकार ‘वॉल्वरिन’ शी केली होती, जे एक असे पात्र आहे ज्याची जखम चमत्कारिकपणे ताबडतोब भरून येते.