home page top 1

‘या’ महिलेला काँग्रेस अध्यक्ष बनवा, भाजप खा. सुब्रह्मण्यम स्वामींचा सल्‍ला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मोठे भाष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन काँग्रेस अध्यक्ष नेमण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना अजूनही योग्य व्यक्ती मिळालेली नाही. यानंतर आता भाजपाच्या सुब्रह्मण्यम स्वामींनी काँग्रेसला सल्ला देत एका महिलेची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमणूक करा, असे म्हटले आहे. त्यांनी काँग्रेसला सल्ला देत म्हटलं की, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचे विलीनीकरण करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे काँगेस अध्यक्षपदाची धुरा द्यावी.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले कि, जर देशात फक्त भाजप हा एकाच पक्ष राहिला तर लोकशाही कमजोर होऊन जाईल. ट्विट करत त्यांनी हा सल्ला काँग्रेसला दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी शरद पवार यांना देखील सल्ला देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील काँग्रेसमध्ये विलीन करावे. यामुळे देशात काँग्रेसला वर येण्यास मदत होईल. गोवा आणि काश्मीरमधील सद्य परिस्थितीवर प्रकाश टाकत त्यांनी हा सल्ला दिला आहे.

दरम्यान, इटालियन्स आणि वंशजांना पार्टी सोडायला सांगा. तरच ममता बॅनर्जी अध्यक्ष होऊ शकतील. त्यानंतर राष्ट्रवादीने देखील यात समाविष्ट होण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यामुळे आता भाजप खासदाराच्या यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’

Loading...
You might also like