ममता बॅनर्जी यांची बदनामी दुर्दैवी, राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी : सुप्रिया सुळे

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख ) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बदनामी करून त्यांना जो सत्ताधाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे तो चुकीचा असून राष्ट्रवादी काँग्रेस अश्या कृत्यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या पाठीशी उभी असेल असे वक्तव्य बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले त्या दौंड तालुक्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान बोलत होत्या.

राज्यसरकारच्या दुष्काळी धोरणांवर सडकून टीका करताना सत्ताधारी हे पावणेपाच वर्षे बारामतीत काहीतरी नवीन शिकण्यासाठी येतात,आणि त्या गोष्टी आपल्या भागात जाऊन त्याचा अवलंब करतात आणि हेच लोक निवडणुकीवेळी शेवटचे वीस दिवस फक्त बारामतीत येऊन वल्गना करतात आणि पुन्हा गायब होतात त्यांना दुष्काळ आणि शेतकर्यांबद्दल मात्र काही वाटत नाही अशी टिका खासदार सुळे यांनी केली.

संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला असताना याच्या झळा आता बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यालाही बसू लागल्या आहेत. दौंड तालुक्यातील याच दुष्काळग्रस्त भागाची पाहणी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेत दुष्काळग्रस्थ भागामध्ये चारा छावण्या आणि टँकर सुरू करण्याबाबतची असलेली मागणी यावर चर्चा करून त्याबाबतच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like