CM ममता बॅनर्जी यांच्या घरी विशेष पूजा; भाजप म्हणते – बंगालमध्ये येणार ‘भगवी लाट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पश्चिम बंगालसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यातच आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या निवासस्थानी विशेष पूजेचे नियोजन करत आहेत.

कोलकाता येथे मुख्यमंत्री निवासस्थानी विशेष पूजेचे आयोजन केले जात आहे. ममता बॅनर्जी यादेखील या पूजेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी ममता बॅनर्जी यांचे राजकारण सुरु झाले आहे. त्यामध्ये त्यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी ई-बाईक चालवली होती. त्यानंतर आता भाजपच्या राकेश सिन्हा यांनी सांगितले, की बंगालमध्ये भगवी लाट आणि मोदी लाट सुरु आहे. बंगालमध्ये ज्या पद्धतीने अराजकता, हिंसा आणि कुशासनचे वातावरण आहे, तिथे आता फक्त भाजपचा विजय होईल. आसाम, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतही भाजप आता राजकीय शक्ती दाखवेल. आसाममध्ये आता विजयासह मतांची टक्केवारीही वाढेल.

आज निवडणुकीच्या तारखा होणार जाहीर?

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आज केली जाण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये यावेळी 6 ते 8 टप्प्यात मतदान घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.