हॉस्पिटलमधून ममतांचा व्हिडीओ संदेश; हल्ल्यात मला गंभीर दुखापत झाली, बाहेर येऊन व्हीलचेअरवरून करेल प्रचार

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयातून आपल्या समर्थकांसाठी एक व्हिडीओ संदेश दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी व्हिडिओमध्ये म्हंटले आहे कि, काल झालेल्या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांचे हात पाय दुखत आहेत. ममता बॅनर्जी म्हणाल्या, त्या काही दिवसांत बाहेर येतील आणि व्हीलचेअरवरून प्रचार करतील.

व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांच्या डोक्यामध्येही बऱ्याच वेदना होत आहेत. आदल्या दिवशी मी लोकांचे अभिवादन स्वीकारणार होते तेव्हाच माझ्या पायाला दुखापत झाली.

ममता बॅनर्जी यांनी आपल्या समर्थकांना शांतता राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांना आशा आहे की, त्या लवकरच रुग्णालयातून बाहेर येतील. त्यांच्या पायाला वेदना होत असल्या तरी त्या व्हीलचेअरवरून व्यवस्थापन आणि प्रचार करतील, असे त्या म्हणाल्या.

काही वेळापूर्वी कोलकत्ता SSKM हॉस्पिटलद्वारे त्यांना हेल्थ बुलेटिनका सोडले. या बुलेटीननुसार ममता बॅनर्जी यांच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांचे एमआरआय स्कॅन झाले आहे.

सध्या ममता दीदींची प्रकृती ठीक असल्याचे हॉस्पिटलने सांगितले. त्यांना आरामाची गरज आहे. हॉस्पिटलमध्ये ६ डॉक्टरांची टीम ममता बॅनर्जी यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवत आहे.

पश्चिम बंगालच्या नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर संध्याकाळी प्रचार दरम्यान संध्याकाळी ६.१५ वाजता हा अपघात घडला. ममता बॅनर्जी यांनी असा डावा केला आहे की, काही लोकांनी त्यांच्या पायावर हल्ला केला त्यामुळे त्यांचा पाय गाडीच्या दाराला लागून दुखापत झाली. संध्याकाळी उशिरा ममता बॅनर्जी यांना कोलकता येथील रुग्णालयात आणले गेले.

ममता बॅनर्जी त्यांच्या दुखापतीमुळे तृणमूल काँग्रेसने गुरुवारी जाहीरनामा जाहीर केला नाही. तसेच १४ मार्चपर्यंत ममता बॅनर्जीं त्यांचे सर्व निवडणूक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. गुरुवारी संध्याकाळी तृणमूल काँग्रेसची निवडणूक समिती महत्वपूर्ण बैठक घेईल.