ममता सरकारचा मोठा निर्णय ! पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल-डिझेल 1 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, बर्‍याच शहरांमध्ये तर 100 पारी केली आहे. विरोधी पक्ष आणि सामान्य जनता केंद्र सरकारवर सतत निशाणा साधत असतात. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने मोठी घोषणा करून इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 1 रुपयांची कपात केली आहे.

वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, बॅनर्जी सरकारचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी रविवारी इंधनाच्या दराबाबत ही माहिती दिली आहे. रविवारी राज्याची राजधानी कोलकाता येथे पेट्रोलची किंमत 91.78 रुपये होती. तर डिझेल प्रति लिटर 84.56 रुपये होते. राजधानी दिल्लीत रविवारी पेट्रोल 90.58 रुपयांवर विकले गेले. विशेष म्हणजे यावर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर ममता सरकारचा हा निर्णय खूप महत्वाचा ठरू शकतो.

यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्या सोमवारी म्हणाल्या की, केंद्र सरकार निवडणुकीच्या काही दिवस आधी किंमती कमी करेल. मुख्यमंत्री म्हणाल्या होत्या ‘ते दररोज एलपीजी आणि डिझेलच्या किंमती वाढवत आहेत. ही चिंतेची बाब आहेे. केंद्र सरकार निवडणुकीच्या काही दिवस आधी किंमती कमी करेल.

फेब्रुवारी महिन्यात पेट्रोलच्या दरात 4.29 आणि डिझेलच्या दरात 4.31 रुपये वाढ झाली. मीडिया रिपोर्टनुसार यंदा दोन्ही इंधनांच्या किंमती सुमारे 24 वेळा वाढल्या आहेत. इंधनाचे वाढते दर यांच्यादरम्यान विरोधी पक्ष केंद्र सरकारवर सातत्याने हल्ले करीत आहेत. या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जाब विचारण्याची मागणी पक्ष करत आहेत. सरकार जनतेसाठी ‘शाप’ ठरल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. कारण याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर जास्त कर लादला आहे.