प. बंगालमध्ये भाजपाला ‘विजयी रॅली’ काढू देणार नाही : ममता बॅनर्जींचा इशारा

कोलकाता : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादन केले. भाजपच्या विजयानंतरमात्र त्यांचे कट्टर विरोधी पश्चिम बंगालमध्ये राजकीय हलचालींना वेग आला आहे. शिवाय पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचेही वळण लागले. त्याला सर्वस्वी जबाबदार भाजप आहे, असं ममता बॅनर्जींचे मत आहे. तसंच झालेल्या हिंसाचारानंतर भाजपाला पश्चिम बंगालमध्ये विजयी रॅली काढू देणार नाही. तसंच या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. ममतांनी गुरुवारी सीआयडी आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांबरोबर हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवसांहून अधिकचा काळ लोटला आहे. तरीही कोणी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्यास पोलिसांनी त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी, असं त्यांनी सांगितलं. तसंच अशा लोकांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्यही त्यांनी दिलं आहे.

भाजप विजयी रॅलीच्या नावावर हुगली, बांकुरा, पुरुलिया आणि मिदनापूरमध्ये हिंसा करत आहे, असा आरोप ममतांनी यावेळी केला. तसंच आतापासून भाजपाला अशी एकही विजयी रॅली काढता येणार नाही, असंही सांगितलं.

दरम्यान, २४ परगाणा जिल्ह्यात तृणमूलचा कार्यकर्ता निर्मल कुंडू यांची हत्या करण्यात आली होती. मतता यांनी निर्मल यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि निर्मल यांच्या आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.