देव तारी त्याला कोण मारी ! ‘दारुडा’ रेल्वे ‘रुळा’वर झोपला, अंगावरुन 3 ‘रेल्वे’ गेल्या तरी ‘जिवंत’ राहिला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देव तारी त्याला कोण मारी अशी म्हणं आहे, परंतू ती आज सत्यात उतरली. एका व्यक्तीच्या अंगावरुन 3 रेल्वे गेल्या तरी तो व्यक्ती दगावला नाही. ही आश्चर्यकारक घटना मध्यप्रदेशात घडली. अशोक नगर भागात एक व्यक्ती रेल्वे रुळावर झोपला, त्यांच्या अंगावरुन तीन रेल्वे गेल्या तरी तो धडधकट जिवंत राहिला. पोलिसांनी ही माहिती दिली. एवढ्या 3 रेल्वे अंगावरुन जाऊन माणसाचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. मात्र पोलिसांना पाहताच या रुळावर झोपलेला माणूस उठला आणि ओरडला की ‘पापा आ गये’.

अंगावरुन 1 रेल्वे गेली तर माणूस वाचणं अवघड असतं, परंतू येथे या व्यक्तीच्या अंगावरुन तीन-तीन रेल्वे गेल्या परंतू हा व्यक्ती जिवंत राहिला. मध्यप्रदेशच्या अशोक नगरात झालेल्या या धक्कादायक प्रकारानंतर ही घटना एक चमत्कार समजली जात आहे. रेल्वेच्या लोकोमोटिव्ह पायलेटने रेल्वे रुळावर एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना कळवली. जो पर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंगावरुन 3 रेल्वे गेल्या होत्या. मात्र पोलिसांना पाहून हा व्यक्ती उठला आणि म्हणाला की ‘पापा आ गये’.

पोलिसांच्या तपासानंतर या व्यक्तीचे नाव धर्मेंद्र असल्याचे कळाले. तो व्यक्ती दारुच्या नशेत होता. त्यामुळे तो रेल्वे रुळावर जाऊन कधी झोपला याचा त्यालाच पत्ता नव्हता. त्याच्या अंगावरुन एक नाही तर तीन-तीन रेल्वे गेल्या याची माहिती देखील या व्यक्तीला नव्हती. ही घडलेली माहिती जेव्हा या व्यक्तीला सांगण्यात आली तेव्हा तो शुद्धीत आला. हा व्यक्ती अशोक नगर रेल्वे स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळावर झोपला होता. या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करुन त्याला सोडण्यात आले.

Visit : Policenama.com

 

You might also like