५ वर्षात वाघांमुळे २०० तर हत्तींमुळे २००० जणांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गत पाच वर्षात हत्तींच्या हल्ल्यात २ हजार ३९८ तर वाघांमुळे दोनशेहून अधिक जणांना जीव गमवावे लागल्याची माहिती लोकसभेत एका प्रश्नामुळे उघडकीस आली आहे. परिणामी मानव आणि वन्यप्राणी संघर्ष वाढत असला तरी त्यामागे अन्नाची, पाण्याची कमतरता हे कारणही अधोरेखित झाले आहे.

केरळचे खासदार अँटो अँटेनिओ यांनी विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय पर्यावरण राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांनी लेखी उत्तर दिले, त्यात हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार २0१४ पासून मार्च २0१९ पर्यंत २३९८ जणांचा मृत्यू हत्तींच्या हल्ल्यामुळे झाला आहे. तर वाघांच्या हल्ल्यात गेल्या पाच वर्षांत एकून २२४ जणांचा बळी गेला असून सर्वाधिक ७१ जणांचा मृत्यू पश्‍चिम बंगालमध्ये झाला आहे.

इतर प्राण्यांमुळे होण्यार्‍या मृत्यूची माहिती एकत्रित केली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यात पाण्याची, अन्नाची कमतरता यामुळे जंगली प्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष होत असल्याचेकडे लक्ष वेधण्यात आले आहे. देशात ५0 व्याघ्र अभयारण्य आहेत. जगभरातील वाघांपैकी भारतात ७0 टक्के वाघ आहेत. देशात २७,३१२ हत्तींची नोंद करण्यात आली. २0१४ मध्ये २२२६ वाघांची नोंद करण्यात आली आहे.

 

महिलांनी गर्भावस्थेत करावे कारल्याचे सेवन, होती अनेक फायदे

योगासने सुरू करताय ? मग या सूचनांचे आवश्य पालन करा

 केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता गुणकारी 

बाळ व बाळंतिणीसाठी गुणकारी आहेत हे घरगुती उपाय 

स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या दर्शक गॅलरीत पाणी