आश्चर्यम् ! चीनमध्ये चक्क नोटांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची धावपळ, जाणून घ्या प्रकरण

बीजिंग : वृत्तसंस्था – चीनमध्ये एका व्यक्तींने ड्रग्स घेतल्याने अनेकांचा फायदा झाला आहे. या २९ वर्षीय व्यक्तीने मिथ नावाचं ड्रग्स घेतले होत. त्यानंतर त्याने घराच्या बाल्कनीतून रस्त्यावर पैसे उधळले. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नैऋत्य चीनच्या शॉपिंगबा येथे आकाशातून अशाप्रकारे पडणाऱ्या नोटांच्या पावसामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. लोक पैसे घेण्यासाठी धावू लागले होते. बो नावाच्या तरुणाने घरातच मिथ नावाचे ड्रग्स घेतले होत त्यानंतर ३० मजल्यावरील बाल्कनीतून त्याने पैसे रस्त्यावर फेकले. आकाशातून पडणाऱ्या नोटांच्या पावसाचा एकाने व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि पोलिसांनाही सांगितले. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बो ला अटक केली. त्यावेळी तो नशेत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याच्यावर नार्कोटिक्स गैरवर्तन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.