6 महिन्यांपासून 12 वर्षांच्या मुलीवर ‘लैंगिक’ अत्याचार करत होता बाप, आईच्या तक्रारीनंतर अटक

हमीरपुर : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशच्या हमीपुरमध्ये एक बापाचे वाईट कृत्य समोर आले आहे. हा बाप आपल्या 12 वर्षाच्या मुलीवर मागील सहा महिन्यांपासून बलात्कार करत होता. मुलीच्या आईने अखेर तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. पोलिसांनी 23 मे राजी सायंकाळी पॉक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हमीपुरचे पोलीस अधीक्षक अर्जित सेन ठाकुर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हमीपुरयेथील महिला पोलीस ठाण्यात एका महिलेने आपल्या पतीवर 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मुलीच्या आईने म्हटले आहे की, तिचा पती लागोपाठ 6 महिन्यापासून तिच्या मुलीवर बलात्कार करत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली आहे. हमीरपुरचे पोलीस अधीक्षक अर्जित सेन ठाकुर यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत. आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like