नवरा – बायको एकत्र बसून पित होते दारू; पतीने पत्नीचा गळा धारदार शस्त्राने कापला

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – मेरठ Meerut (उत्तर प्रदेश) Uttar Pradesh च्या ब्रम्हपुरी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. नशेत असलेल्या पतीने Husband त्याच्या पत्नीचा Wife गळा धारदार शस्त्राने कापला. हा हल्ला झाला तेव्हा महिलाही नशेत होती. घटनेनंतर तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने हे कृत्य केलं. पोलिसांनी आरोपी पतीला अटक Arrest केली आहे.

विकास उर्फ विक्की असं आरोपीचं नाव आहे.
विकासचं लग्न गेल्यावर्षी दिल्लीतील नेहासोबत झालं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही रात्री उशिरा दारू पित बसले होते.
यादरम्यान नेहाच्या फोनवर एक कॉल आला.
यावरून नेहा आणि विकासमध्ये वाद झाला. हा वाद खूप टोकाला गेला.
नशेत असलेल्या विकासने आधी तिला मारहाण केली आणि नंतर भाजी चिरण्याच्या चाकूने तिच्या गळ्यावर वार केला.
बराच वेळी ती रक्ताच्या थारोळ्यात घराच्या छतावर पडली होती.
शेजारच्या काही लोकांनी याची माहिती विकासच्या आईला दिली.
ती घटनास्थळी पोहोचली आणि तिने लोकांच्या मदतीने नेहाला हॉस्पिटलमध्ये Hospital दाखल केलं.

पोलिसांनी Police दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे.
पती-पत्नी Wife दोघेही सोबत दारू Alcohol पित होते.
यादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि पतीने चाकूने पत्नीवर Wife हल्ला केला.
पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, आरोपी पतीच्या आईने सांगितलं की, ती कामावर गेली होती आणि जेव्हा परतली तेव्हा दोघांच्या भांडणाबाबत समजले.
दोघांनीही दारू प्यायली होती. मी सुनेला माझ्यासोबत खाली चलण्यास सांगितलं.
पण ती काही आली नाही. आरोपीची आई पुढे म्हणाली की, सूनेला कुणाचा तरी फोन आला होता.
ज्यानंतर मुलगा संतापला आणि त्याने भाजी चिरण्याच्या चाकूने तिच्या गळ्यावर वार केला.
लॉकडाऊन Lockdown असताना मी पोलिसांकडून परवानगी घेऊन दोघांचं लग्न लावून दिलं होतं.
सूनेने भाड्याने वेगळी रूमही घेतली होती.
दोघेही वरच्या घरात राहत होते आणि मी पतीसोबत खाली राहत होती.
मुलाने वरच्या खोलीला लॉक लावून ठेवलं होतं. मी ते तोडलं आणि काही लोकांना बोलवून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात