शिरवळ येथील पत्रकारावर खुनी हल्ला करणारा फरार आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कट रचून पत्रकारावर सत्तुर आणि कोयत्याने खुनी हल्ला करणाऱ्या फरार सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. जावेद मुल्ला असे त्याचे नाव असून त्याला आज कात्रज येथील संतोषीमाता मंदिराजवळ अटक करण्यात आली. जावेद याने ११ एप्रिल २०१९ रोजी रात्री साडेदहाच्य सुमारास खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे मुराद पटेल या पत्रकारावर खुनी हल्ला केला होता. घटनेनंतर तो फरार झाला होता.

मुराद पटेल यांच्यावर कट रचून आरोपी जावेद मुल्ला याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने शिरवळजवळ खुनी हल्ला केला होता. गुन्हा केल्यानंतर तो फरार झाला होता. दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान आज शिरवळ येथील पत्रकारावर हल्ला करणारा मुल्ला हा कात्रज संतोषीमाता मंदिर परिसरात हातामध्ये कोयता घेऊन रस्त्याने पायी जाणाऱ्यांना शिवीगाळ करत असून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यासाठी धमकावत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी कुंदन शिंदे आणि सर्फराज देशमुख यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने संतोषीमाता परिसरातून आरोपी मुल्ला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने पत्रकारावर खुनी हल्ला केल्याची कबुली दिली. गुन्हा केल्यानंतर तो दोन महिने पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी या गुन्ह्यात यापूर्वी दोघांना अटक केली आहे.

ही कारवाई पूर्व प्रादेशीक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त प्रिती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णु ताम्हाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी सचिन पवार, कृष्णा बढे, कुंदन शिंदे, गणेश चिंचकर, सर्फराज देशमुख, महेश मंडलीक, राहुल तांबे, अभिजीत रत्नपारखी यांच्या पथकाने केली.

‘या’ अभिनेत्रीला मिळतात केवळ ‘बार डान्सर’ आणि ‘लोकांगना’चे रोल

‘या’ डायरेक्टरला पहायचाय अभिनेता आयुष्मान खुराणाचा ‘प्रायव्हेट पार्ट’

ओबीसीमधून एखाद्या समाजाला वगळण्याचा अधिकार राज्य सरकारला : उच्च न्यायालय

विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे घेतल्यास शैक्षणिक संस्थावर कडक कारवाई होणार

‘अ‍ॅसिडिटीचा’ त्रास टाळण्यासाठी हे उपाय करा, होईल फायदा

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय