हद्दपार आदेशाचा भंग, सांगलीत गुन्हेगारास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  – हद्दपार आदेशाचा भंग करून सांगली शहरात वावरणाऱ्या गुन्हेगारास अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कारवाई केली. आकाश सदाशिव मोहिते (वय 20, रा. त्रिमूर्ती कॉलनी, विश्रामबाग) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

हद्दपार केलेले गुन्हेगार आदेशाचे भंग करून पुन्हा वावरत असल्याचे वारंवार दिसून येते होते. त्यानुसार त्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी एलसीबीली दिले होते. त्यानुसार निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले होते.

पथकातील पोलिस गस्तीवर असताना शंभरफुटी रस्त्यावर आकाश मोहिते हा फिरताना आढळून आला. त्याला सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार केले होते. तो आदेश भंग करून तो पुन्हा सांगलीत फिरत असताना ही कारवाई करण्यात आली.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like