महिला पोलीस कर्मचाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्याला अटक

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

स्वत: राँग साईड येऊनही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना उलट शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग करण्याचा प्रकार मुंढवा येथील महात्मा फुले चौकात घडला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी रवी अशोक सरतापे (वय ३२, रा. नताशा एन्क्लेव्ह, कोंढवा खुर्द) याला अटक केली आहे.

[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’750a5985-a4f7-11e8-a736-0d070273561c’]

वाहनांनी बजबजपूरी झालेल्या पुण्यातील रस्त्यावर ऊना पावसाची तमा न बाळगता वाहतूकीचे नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वाहनचालकांच्या उद्धद वर्तनाचा त्रास दिवसेंदिवस वाढला आहे. त्यात महिला कर्मचाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ, शेरेबाजी यांना सामोरे जावे लागत आहे. मुंढव्यात सोमवारी एका वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यापर्यंत एकाच मजल गेली.

याप्रकरणी वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्या गेल्या ३ वर्षांपासून हडपसर वाहतूक शाखेत नेमणूकीला आहे. सोमवारी सकाळी त्या मुंढवा येथील महात्मा फुले चौकात वाहतूक नियमन करण्याचे काम करीत होत्या. अकराच्या सुमारास रवी सरतापे हा केशवनगरकडून राँग साईडने येऊन मुंढव्याकडे जाणाऱ्या सिग्नलला थांबला होता. त्यावेळी या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला मुंढव्याकडून येणारा सिग्नल सुटणार आहे. तुमच्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होईल, तुमची गाडी सिग्नलला साईडला घ्या. तेव्हा तो त्यांना एकेरी भाषेत तूच साईडला हो. त्यावर त्यांनी तू मला अरे तुरे बोलू नकोस असे म्हणाल्या. त्याने मी अधिकाऱ्याचा मुलगा आहे. तू मला काही शिकवू नकोस. तेव्हा त्यांनी गाडी साईडला घ्या व वडिलांना बोलवा असे सांगितले. रवी सरतापे हा वाद घालत असल्याचे पाहून त्याच चौकात असलेले पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे तेथे आले व त्यांनी पोलीस शिपाई आढाव यांना गाडीला जॅमर लाव. त्यास त्याचे वडिलांना घेऊन येऊ दे, असे म्हणाले.

त्यावर रवी मी सगळ्यांना बघून घेईन. माझे कोणी काही वाकडे करु शकणार नाही. अशी धमकी देऊन या महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. व वडिलांना घेऊन येतो, असे म्हणतन तो मुंढव्याच्या दिशने गेला. हवालदार भोसले यांना भेटला. त्याच्या पाठोपाठ या महिला कर्मचारी गेल्या व हवालदार भोसले यांना घडला प्रकार सांगत असताना त्याने या महिला कर्मचाऱ्यांचा हात धरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हात झटकल्यावर त्याने अश्लिल शिवीगाळ केली. भोसले त्याला समजावून सांगत असताना त्याने या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथे लोकांची गर्दी झाल्याने भोसले यांनी त्याला मुंढवा पोलीस ठाण्यात नेले.

महिला कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा करुन त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्याचा विनयभंग करणाऱ्या व शासकीय कामात अडथळा केला म्हणून पोलिसांनी रवी सरतापे याला अटक केली. रवी सरतापे हा काहीही काम धंदा करत नाही.