‘त्यानं’ चक्क बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीला खासगी फोटोंवरून केलं ‘ब्लॅकमेल’, मुंबईच्या क्राईम ब्रँचनं 25 वर्षीय युवकाच्या आवळल्या मुसक्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीची खासगी क्षणांची चित्रित केलेले फोटो समाजमाध्यमांवर पसरवण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या एका नराधमाला मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मालाड येथील रहिवाशी आहे. गुरुवारी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने त्याच्या मुसक्या आवळल्या. कुमैल हनिफ पटाणी ( वय २५ रा. मालाड) या तरुणाला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ ला पकडण्यात यश आलं आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमानांतर्गत महिलेचा विनयभंग आणि खंडणी मागण्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान पुढे आलेल्या तपशिलानुसार, आरोपीची बहीण आणि पीडित मुलगी या दोघी मैत्रिणी होत्या. त्या दोघी एकाच महाविद्यालयात शिकत असल्याने त्यांची ओळख होती. आरोपीने अभिनेत्याच्या मुलीला इन्स्टाग्रामवर मेसेज केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. आरोपीने तिला असे सांगितले होते की, तो कॉलेजमध्ये असल्यापासून तिला ओळखतो आणि तेव्हापासून तिचे काही खासगी फोटो त्याच्याकडे आहे.

‘आरोपीने पिडीतेला समाजमाध्यमातून मेसेज पाठवले होते आणि त्याचे पुरावे राहू नयेत म्हणून त्याने डिलीट केले. कुमैलने या अभिनेत्याच्या मुलीला चित्रित केलेली फोटो सगळीकडे पसरवण्याची धमकी दिली होती. नंतर त्याने मुलीला बोलवून खंडणीची मागणी केली” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी जाधव यांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like