साप व इतर प्राण्यांचे व्हिडिओ तयार करुन सोशल मिडियावर प्रसारित करणाऱ्यास अटक

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – साप व इतर प्राण्यांचे व्हिडिओ तयार करुन यु ट्यूब या सोशल मिडियावर प्रसारित केल्या प्रकरणी वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करत एका व्यक्तीस अटक केली आहे.

वन विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या माहितीनुसार, साईदास शंकर कुसळ (साई सत्यम पार्क) रा. वाघोली, ता. हवेली या इसमाला अटक केली आहे. साईदास याने साप व इतर प्राण्यांचे व्हिडिओ तयार करुन ते यु ट्यूब या सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते प्रसिद्ध केले. कोणत्याही प्राण्याचे व्हिडिओ तयार करणे हा वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे या कायद्या अंतर्गत याचेवर कारवाई करुन अटक केली व न्यायालयासमोर उभे केले. त्यास वनकोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई श्रीलक्ष्मी ए. उपवनसंरक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक संजय मारणे यांच्या नेतृत्वाखाली मुकेश सणस वनपरिक्षेत्र अधिकारी या पथकाने केली. यात अनिल राठोड मनोज पारखे राहुल रासकर विशाल यादय या वन रक्षकांनी सहभाग घेतला.

या कारवाई नंतर मुकेश सणस यांनी सांगितले की वन्यजीव संरक्षण कायद्या नुसार कोणत्याही प्राण्यांचे व्हिडिओ चित्रीकरण तसेच ते हाताळतानाचे चित्रीकरण करुन करुन सोशल मिडियावर प्रसारित करणे हा गुन्हा आहे त्यामुळे असे व्हिडिओ तयार करु नये.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/