ब्रँडच्या नावाखाली बनावट शर्टची विक्री, एकाला अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – नामांकित कंपनीच्या ब्रँडच्या शर्टचे लोगो वापरुन ते ब्रँडेड कंपनीच्या दरात विक्री करणाऱ्या एका गारमेंट कारखान्यावर भिवंडी गुन्हे शाखेने छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी ७ लाख ७५ हजार रुपयांचे ७७६ शर्टसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई नुकतीच करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी भरत हसमुखराय जोशी (वय -६० रा. घाटकोपर) याला अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f9ec84be-d2b9-11e8-8bd1-6d5f90bd3c91′]

कमी प्रतीच्या कपड्याचे शर्ट तयार करून या शर्टवर नामांकित कंपनीच्या ब्रँडच्या शर्टचे लोगो, किंमत, कागदी रिबन लावून शर्टची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी सियाराम सिल्क मिल प्रा. लि. कंपनीच्या ब्रँडेड शर्ट दुय्यम दर्जाच्या कपड्याच्या सहाय्याने तयार करून ते शर्ट ब्रँडेड असल्याचे भासवले जात होते.

या शर्टची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत आणि त्यांच्या पथकाने जोशी याच्या भिवंडीतील श्री अरिहंत कॉम्प्लेक्समधील कारखान्यावर छापा टाकला. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडीएमटीच्या धडकेत अधिकाऱ्याचा मृत्यू

ठाणे : रस्त्याच्या मध्यभागी असलेला दगड चुकविण्याच्या नादात कल्याण डोंबिवली महापलिका परिवहन बसचा बुलेटला धक्का लागून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शिळ-डायघर परिसरात घडली. या अपघतात उत्पादन शुल्कचा आणखी एक कर्मचारी जखमी झाला असून बसचालकाविरुद्ध शिळ-डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्कच्या नवी मुंबई कार्यालयातील दुय्यम निरीक्षक राजेंद्र निकुंभ (रा. कल्याण पूर्व) आणि जवान विनोद जाधव (४६ रा. संघवी रिजन्सी, कल्याण) मंगळवारी सकाळी बुलेटवरून कार्यालयात निघाले होते.

मुंबई | एकनाथ खडसेंना ‘मंत्री’ पद की ‘प्रदेशाध्यक्ष’ पद ?

यावेळी बुलेटच्या पाठीमागे निकुंभ बसले होते. कल्याण-शिळ रस्त्यावरून जात असताना येथील भोलेनाथ हॉटेलसमोर बुलेटच्या उजव्या बाजूला समांतर केडीएमटी बस जात होती. मात्र रस्त्यावर मध्यभागी असलेला दगड वाचविण्यासाठी चालकाने बस वेगात डाव्या बाजूला घेतल्याने बसचा धक्का बुलेटला लागला. त्यामुळे बुलेट चालवताना जाधव यांचा तोल गेला आणि दोघेही रस्त्यावर बुलेटसह पडले. या अपघातात निकुंभ बसच्या डावीकडील मागील चाकाखाली आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तातडीने निकुंभ यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात जाधवही जखमी झाले आहेत.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’25ab18ea-d2ba-11e8-aa88-99a27ed565de’]