मुलीच्या लग्नाच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार करणार्‍यास अटक

पोलिसनामा ऑनलाईन – मुलीचा सांभाळ करून तिचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर गेली तीन वर्षे अत्याचारासह अनैसर्गिक कृत्य करणार्‍या नराधमास पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. रावसाहेब विधाटे (रा. म्हैसगाव आग्रेवाडी, ता. राहुरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

विधाटे याने 2017 मध्ये पीडित महिलेच्या मुलीच्या लग्नासह सांभाळण्याचे आमिष दाखविले होते. पीडितेस तिच्या संमतीशिवाय पळशी (पारनेर) येथे, तसेच म्हैसगांव (आग्रेवाडी, राहुरी) येथे वेळोवेळी अत्याचार केले. अनैसर्गिक कृत्येही करण्यास भाग पाडायचा. त्यास विरोध केल्यास लाथा बुक्कयांनी मारहाण केली. महिला आजारी असल्यामुळे फिर्यादीच्या मुलीने दवाखान्यातील उपचारांसाठी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपी विधाटेने शिवीगाळ करून, तुझा व माझा काही संबंध नाही, तू तुझ्या घरी निघून जा. माझ्या विरोधात कुठे तक्रार केली तर तुला व तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही दिली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.