54 वर्षांच्या व्यक्तीचे ‘दुष्कर्म’, 120 महिलांना पाठवले स्वतःचे न्यूड फोटो

चित्रदुर्ग : कर्नाटक पोलिसांनी शुक्रवारी एका 54 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने मागील सहा महिन्यांच्या दरम्यान 120 महिलांसह 200 पेक्षा जास्त लोकांना आपली न्यूड छायाचित्रे पाठवली आहेत.

रामकृष्ण असे या व्यक्तीचे नाव असून तो चित्रदुर्गच्या चल्लकेरे येथे राहणारा आहे. एक आठवड्यापूर्वी काही लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली की, त्यांना अज्ञात नंबरवरून ही छायाचित्रे मिळाली आहेत.

’द न्यूज मिनट’च्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रामकृष्णचा तपास सुरू केला. त्याचा मोबाइल फोन ट्रॅक करण्यात आला आणि शुक्रवारी त्यास चल्लकेरे येथील त्याच्या घरातून अटक केली.

पोलिसांच्या चौकशीत रामकृष्णने छायाचित्र पाठवल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याने त्या नंबरवर सुद्धा आपली छायाचित्रे पाठवली होती, जे त्याला माहित नव्हते. चल्लकेरेमधीलच जवळपास 50 महिलांना ही छायाचित्र पाठवण्यात आली होती.

इतकेच नव्हे, काही महिलांकडे तो त्यांची न्यूड छायाचित्रे सुद्धा मागत होता. रामकृष्णला अटक करून चित्रदुर्गमध्ये न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.