फेसबुकवर अश्लील मेसेज, फोटो पाठविणाऱ्यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बनावट फेसबुक अकाऊंट वापरुन शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या फेसबुकवर अश्लिल फोटो आणि मेसेज पोस्ट करणाऱ्याला पुणे सायबर क्राईम सेलच्या पथकाने अटक केली.

अनिकेत आत्माराम डोंगरे (वय-३० रा. कसबा पेठ, पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका मुलीने सायबर क्राईम सेलकडे तक्रार दिली होती.
[amazon_link asins=’B0711LSJFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’38827a29-9992-11e8-84de-354696cf809f’]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत डोंगरे याने मॅडी डिसुजा नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. या अकांऊंटवरुन त्याने तक्रारदार मुलीच्या फेसबुक पेजवर अश्लिल फोटो, मेसेज पोस्ट केले. त्याला पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची सांगून देखील त्याने फोटो पोस्ट केले. मुलीने सायबर सेलकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन आरोपीला अटक केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह, साहय पोलीस आयुक्त निलेश मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रुपाली पवार, महिला पोलीस शिपाई माधुरी डोके, पोलीस शिपाई किरण अबदागिरे, अनुप पंडीत, आदेश चलवादी याच्या पथकान केली.